सोलापूर : सदर बझार पोलिसांकडे दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी चर्चेत आले आहेत. डॉ. राखी सुहास माने असं या आरोग्य अधिकाऱ्याचं नाव आहे. त्यांची फिर्याद राजकीय पक्षाचा पदाधिकारी आणि पत्रकारांना आरोपीच्या चौकटीत उभी करणारी तर आहेच, त्याचबरोबर त्यांच्या ' श्रीमंती ' चं दर्शन देणारी आहे. न्यूज चॅनलच्या माध्यमातून मानहाणीकारक वृत्त प्रसारित करून त्यांच्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्यानंतर डॉ. माने प्रसिद्धीच्या झोतात आल्याचे दिसते.
सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यापासून चर्चेत राहिलेलं व्यक्तिमत्व म्हणून डॉ. राखी माने मध्यम वर्तुळात पाहिलं गेलंय. शैक्षणिक पात्रता रुग्णसेवा करण्याच्या उंचीची असून त्या आरोग्य अधिकारी पदाची जबाबदारी पेलायला वैद्यकीय पदवीच्या अनुषंगाने पात्र नाहीत, अशा संशयाच्या धुक्यात त्या आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, असा माध्यमात आलेल्या वृत्ताचा सूर आहे.
शासनाने त्यांना सोलापूर महानगरपालिका आरोग्य अधिकारी पदावर प्रतिनियुक्तीवर पाठविलेले असले तरी ते त्या पदाला न्याय देऊ शकणार नाहीत, सोलापुरातील जाणकारांचं मत असून या आडून शहरातील नागरिकांच्या आरोग्याची शासन खेळण्याचा प्रयत्न करीत असल्याची भीती काहींनी व्यक्त केली आहे.
राजकीय पक्षाच्या शहराध्यक्षांसह तिघांनी बदनामीकारक बातम्या प्रसारीत करण्याच्या आडून दोन कोटी रुपयांची मागणी केल्याची फिर्याद सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी दाखल केलीय. हा प्रकार ११ जूनपासून वेळोवेळी घडलाय. त्या फिर्यादीनुसार प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी, एमडी ट्वेंटी फोर न्यूज चैनलचे सैपन शेख याच्यासह तिघांविरुद्ध भा. न्या. संहिता कलम ३०८ (२), ३५६,३५१ (२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय.
माध्यमात आलेल्या बातम्यांमुळे त्रासलेल्या डॉ. माने यांनी प्रहार जनशक्तीचे अजित कुलकर्णी यांना बोलण्यास गेल्यावर कुलकर्णी यांनी ०२ कोट रूपयांची मागणी केली, तसेच पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी सत्ताकारण ऑनलाईन न्यूज चॅनलचे पत्रकार रणजीत वाघमारे यास डॉ. माने यांच्या ऑफिसमध्ये पाठविले तेथे वाघमारे यांने डॉक्टरकडे वांरवार पैशाची मागणी करून त्रास दिला आहे, असं डॉक्टर माने यांनी आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे.
पैसे नाही दिल्यास त्रास होईल, अशी धमकी दिली, प्रकरण शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मनीष काळजे यांच्या ' सेवालया ' पर्यंतही पोहोचले. त्यानंतर अजित कुलकर्णी यांनी वरीष्ठ अधिकारी (उपसंचालक, पुणे मंडळ) डॉ. राधाकिशन पवार उप संचालक पुणे मंडळ यांचे कार्यालय जाऊन त्यांना डॉ. मानेकडून दोन कोट रूपये देण्यास सांगण्याबाबत सांगितले, डॉ. राखी माने यांनी पैसे न दिल्याचे कारणावरून त्यांच्या चॅनलवर बातमी प्रसारीत करून बदनामी करीत आहे, असल्याची डॉ. माने यांची फिर्याद आहे.
प्रहार संघटनेचे अजित कुलकर्णी, एम.डी. न्युज चॅनलचे पत्रकार सैपन शेख आणि सत्ताकारण ऑनलाईन न्यूज चॅनलचे पत्रकार रणजीत वाघमारे अशी आरोपींची नांवे आहेत. पोलीस निरीक्षक ढवळे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.