Type Here to Get Search Results !

पोलिसांसाठीच्या जागेच्या प्रश्नासाठी मी केलेला छोटासा प्रयत्न : सेवानिवृत्त पोलीस आयुक्त महेशगौरी


सोलापूर : मी जन्मल्यापासून पोलीस लाईन व अधिकारी झाल्यानंतरच सरकारी बंगल्यात राहिलो. सेवानिवृत्त झाल्यानंतर मी माझ्या खाजगी घरात गेलो. त्यावेळी जागेचा पोलिसांच्या जागेचा प्रश्न काहीतरी प्रमाणात सोडवावा, म्हणून मी हा छोटासा प्रयत्न केला, असं सोलापूरचे तत्कालिन पोलीस आयुक्त महेशगौरी यांनी म्हटले.


पोलीस कर्मचारी वा अधिकारी सेवेत असेपर्यंत पोलीस लाईन अथवा सरकारी निवासस्थानी वास्तव्यास असतात, मात्र सेवानिवृत्तीनंतर हक्काचं घर असावं, प्रत्येकाचं स्वप्न असतं, या स्वप्नाला बळ देण्याचं मोठं कार्य महेशगौरी यांनी सोलापुरात पोलीस आयुक्त म्हणून कर्तव्य बजावत असताना केलं. पुणे महामार्गावरील केगांव परिसरात ३४ एकर क्षेत्र नियोजित पोलीस हाऊसिंग सोसायटीला उपलब्ध करून दिली.



या सोसायटीला सेवानिवृत्त अधिकारी महेशगौरी यांनी नुकतीच भेट दिली. त्याप्रसंगी त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अशोक दिलपाक यांच्यासह अन्य सभासद उपस्थित होते.