सोलापूर : येथील निवासी, अखिल भारत पद्मशाली पुरोहित संघमचे अध्यक्ष पंडित वेणूगोपाल जिल्ला पंतुलू यांचे चिरंजीव पंडित श्रीनिवास वेणूगोपाल जिल्ला यांची दक्षिण आफ्रिकेतील लायबेरिया या देशातील मोनोरया शहरातील प्रसिध्द हिंदू मंदिरात मुख्य अर्चक म्हणून निवड केली आहे.
श्रीनिवास जिल्ला पंतुलू यांचे पूर्ण वैदिक अध्ययन काशी व रत्नागिरी येथील वैदिक पिठात झाले. एका पद्मशाली पुरोहित बांधवास प्रथमच परेदशात प्रमुख अर्चक होण्याचा मान मिळाला. हा पद्मशाली समाजाचा सन्मान आहे. चि. श्रीनिवास हे जिल्ला पंतुलू परिवाराचे ५ वी पिढी आहे. व त्याचे वय १७ आहे. त्यांचे शालेय शिक्षण सोलापूर येथील सिध्देश्वर प्रशाला येथे झाले.
त्यांच्या निवडीचे समाजबांधवांकडून स्वागत करण्यात येत असून त्यांच्या या परदेश वारीला अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. श्रीनिवास जिल्ला याला प्रदेशात स्थायिक होण्यासाठी गणेश दासरी यांचे विशेष सहकार्य मिळाले असल्याचे माहिती श्रीनिवास जिल्ला वडील वेणूगोपाल जिल्ला यांनी सांगितले.
या यशाचा शिखरापर्यंत पोहोचण्यास मला आजोबाचे आशिर्वाद तसेच माझे वडील वेणुगोपाल, माझी आई अन्नपूर्णा, बहीण वेदांगी यांचे मार्गदर्शन व आशिर्वाद लाभले. तसेच गणेश दासरी बहुमोल सहकार्य लाभले, असल्याची माहिती पंडित श्रीनिवास जिल्ला यांनी सांगितले.