Type Here to Get Search Results !

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेअंतर्गत बक्षी हिप्परगे येथे मोफत फाॅर्म शिबिराचे आयोजन


कासेगाव/संजय पवार

दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगा येथे नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेच्या मोफत फॉर्म भरून ऑनलाईन तसेच ऑफलाइन भरून देण्याचा शुभारंभ आमदार सचिन कल्याणशेट्टी युवा मंचचे पदाधिकारी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. 

यावेळेस महिलांना मोफत ऑफ लाईफ व ऑनलाईन   भरून देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत आत्तापर्यंत 63 महिला ऑनलाईन केलेले प्रमाण पत्र देण्यात आले. यावेळी महायुती सरकारच्या या उपक्रमाचं स्वागत करण्यात आले.

महिलांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण होते. लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक महिलांना पंधराशे रुपये देण्याची योजना या शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी व महिला वर्गाचा त्रास कमी करण्यासाठी हा उपक्रम राबवीत असल्याचे गावातील सामाजिक कार्यकर्ते सागर खांडेकर यांनी सांगितले. 

यावेळी गोविंद निकम, युवा उद्योजक बाबासाहेब माने, नेताजी माने, शिवाजी महाडिक, प्रभाकर महाराज निकम, रमेश दोलतोडे, राघू काताळे, अंबादास सलगर, आण्णासाहेब खांडेकर, बापू माने व महिला-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.