सोलापूर : राज्य शासनाच्या वतीने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ' ही योजना जाहीर करण्यात आलीय. या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे लवकरात लवकर विना विलंब आणि विना शुल्क मिळावेत, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने एका करण्यात आली. ज्या महिलांनी शाळा सोडलेले आहे, त्यांना शाळा सोडल्याचा दाखला देण्याची व्यवस्था करावी, तसेच त्यासाठी कोणते प्रकारची आकारले जाऊ नये अशी मागणी करण्यात आलीय. या मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री सोमनाथ राऊत, शहराध्यक्ष शिवश्री प्रकाश ननवरे, कार्याध्यक्ष सचिन चव्हाण, शिवश्री राम माने, वधु वर कक्षाचे शहर अध्यक्ष, प्रकाश भोसले , सोमनाथ निंबाळकर, भिवा भोसले, समाधान कदम इत्यादी उपस्थित होते.