Type Here to Get Search Results !

संत गजानन महाराज पालखीसोबत मार्गस्थ वारकऱ्यांना मिनरल वॉटरचे वाटप


सोलापूर : शेगांवहून पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ गजानन महाराज पालखीचे उत्तर सोलापूर तालुक्यातील तळेहिप्परगा गावात आगमन झाल्यानंतर मराठा सेवा संघ आणि डॉ. ईश्‍वर जाधव मित्र परिवार यांच्याकडून पालखीत सहभागी झालेल्या वारकर्‍यांना मिनरल वॉटरचे वितरण करण्यात आले. यावेळी हिप्परगा गावचे सरपंच सचिन भिंगारे, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



'गण गण गणात बोते' चा जयघोष करीत संतश्रेष्ठ गजानन महाराज पालखी तुळजापूरकडून मंगळवारी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केली. त्यानंतर उळे येथे मुक्काम करून बुधवारी सकाळी पालखी सोलापूर शहराकडे मार्गस्थ होत असताना तळे हिप्परगा येथील मश्रृम गणपती मंदिरसमोर आली. त्यावेळी तळेहिप्परगा ग्रामस्थांनी मोठ्या भक्तीभावाने पालखीचे स्वागत केले. सेवानिवृत्त शिक्षक लिंबराज जाधव यांनी प्रारंभी सपत्नीक पालखीतील गजानन महाराज यांच्या मुर्तीची पुजा केली. 



त्यानंतर पालखीत शिस्तबध्दपणे सहभागी झालेल्या सर्व वारकर्‍यांना मिनरल वॉटरची बाटली देऊन सेवा संपन्न केली. त्यानंतर संभाजी ब्रिगेडचे शहर अध्यक्ष प्रकाश ननवरे, उपाध्यक्ष सदाशिव पवार, रमेश जाधव, वधू-वर सूचक मंडळाचे अध्यक्ष राम माने, मार्गदर्शक सचिन चव्हाण, गोवर्धन गुंड, विनायक घाटे, समर्थ होटकर, विनायक होटकर, ओंकार जाधव यांच्या हस्ते सेवा संपन्न करण्यात आली. यावेळी मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचे मावळे उपस्थित होते.