Type Here to Get Search Results !

आता प्रत्येक महिन्याच्या ७ ते १५ तारखेला मिळेल रेशनमध्ये धान्य : अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे


सोलापूर : अन्न सुरक्षा दिनाचा मुख्य उद्देश लोकांमध्ये जागरूकता पसरवणे हा आहे. जेणेकरुन लोकांना जाणीव होईल की, ते खात असलेले अन्न स्वच्छ आणि सुरक्षित, खाण्यायोग्य आहे की नाही? यासोबतच स्वच्छ खाण्याची सवय व्हावी, यासाठी सरकार, व्यवसायी आणि ग्राहकांना कृती करण्यास प्रेरित करणे हा सुद्धा हा दिवस साजरा करण्याचा उद्देश आहे. सोलापुरात आता प्रत्येक महिन्याच्या ७ ते १५ तारखेपर्यत रेशनमध्ये धान्य वाटप करणार असल्याची माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी दिली.



ह्याच अनुषंगाने सोलापूर अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे ह्यांनी ही योजना प्रभावीपणे राबविण्याकरिता सोलापूर शहरातील दुकानदाराचे बैठक बोलावून अन्न सप्ताह दिनाबाबत महत्व सांगून त्या अंमलात आणण्यासाठी सक्त सूचना दुकानदारांना दिले. दुकानंदारानी जुलै महिन्यापासून अन्न सप्ताह दिनाचे औचित्य साधून वाटपास सुरुवात केली असून नागरिकांचा देखील उत्तम प्रतिसाद मिळत आहे.



अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांच्या संकल्पनेतून ekyc मोहीम बाबतीत शिबीर देखील दुकानदार संघटनेच्या वतीने यशस्वी पार पडली आहे. नागरिकांनी महिन्याच्या सुरुवातीलाच वेळेत धान्य मिळत असल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. 



ही योजना संपूर्ण महाराष्ट्र भरात फक्त सोलापूर शहरातच प्रभावीपणे राबवत असल्याचे व दि. ७ ते १५ तारीख धान्य वाटप तसेच दिनांक १६ ते ३० तारखेपर्यंत पुन्हा ekyc मोहीम राबविणार असल्याचे जिल्हा प्रमुख नितीन पेंटर  यांनी सांगितले.