सोलापूर : जिल्हा क्रिडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर सोलापूर तालुकास्तरीय बुद्धिबळ व योगासन स्पर्धा जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मिडियम स्कूल येथे नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धमध्ये जिजाऊ ज्ञान मंदीर इंग्लिश मिडियम स्कूल व विजयसिंह मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालय कोंडी येथील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेमध्ये उत्तुंग भरारी घेतली. या स्पर्धेमध्ये जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलातील विद्यार्थ्यांनी नेत्र दिपक यश प्राप्त केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
१४ वर्ष वयोगटामध्ये
मुलं व मुली: योगासन स्पर्धेत
१) आविष्कार प्रसेनजित काटे: प्रथम क्रमांक
२) धनराज रमेश साठे : तृतीय क्रमांक
३) विरेंद्र भिवाजी भोसले : सहावा क्रमांक
तर मुलींमध्ये
१) प्रज्ञा नारायण नीळ प्रथम: क्रमांक
२) सह्याद्री पंडित नीळ: तृतीय क्रमांक
१७ वर्ष वयोगटामध्ये :
१) शंभुराजे नागेश जाधव: दुसरा क्रमांक
१९ वर्ष वयोगटांमध्ये : मुलांमध्ये मध्ये
१) अभिषेक बालाजी सुरवसे : दुसरा क्रमांक
२) समर्थ मारूती शेंडगे : तृतीय क्रमांक
तर मुलींमध्ये
१) श्रेया अरुण विश्वकर्मा: दुसरा क्रमांक
२) स्नेहा संतोष साठे : तिसरा क्रमांक
चेस (बुध्दिबळ) या मध्ये १४ वर्ष वयोगट मुलीमध्ये
१) प्रज्ञा नारायण नीळ दुसरा क्रमांक
तर १७ वर्ष वयोगट मुलामध्ये
१) रोशन रमेश बड़ोदिया : दुसरा क्रमांक
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जाणता राजा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गणेश नीळ म्हणाले, आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये यशाच्या मार्गावरून जाणाऱ्या अनेक विद्यार्थी असतात, परंतु यश मिळवणारे मात्र कमी असतात. जिजाऊ ज्ञान मंदिरमधील सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. या सर्व यशस्वी खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सुद्धा प्रचंड यश मिळावे. सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेसाठी निवड झाल्यामुळे त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा सर्व शिक्षकांनी दिल्या.
आकाशात भरारी घेताना पक्षाला पंख असावे लागतात. विद्यार्थ्यांना सुद्धा उंच भरारी घेण्यासाठी चांगले शिक्षक रुपी पंखच असावे लागतात, त्याशिवाय कोणताही विद्यार्थी उत्तुंग भरारी घेऊ शकत नाही. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी लाख-लाख शुभेच्छा या शब्दात प्राचार्य सुषमा निळ यांनी या सर्व विद्यार्थ्यांचं अभिष्ठचिंतन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना क्रिडा शिक्षक दिलीप भोसले सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष गणेश निळ, प्राचार्य सुषमा निळ, मुख्याध्यापिका अर्चना औरादे, मुख्याध्यापक वैभव मसलकर, संकेत मोरे , रवी कोतकुंडे आदींसह शिक्षक आणि यशस्वी विद्यार्थी उपस्थित होते.