Type Here to Get Search Results !

दाद्या काळे ०२ जिल्ह्यातून तडीपार


सोलापूर : शहरात कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित राहण्याच्या उद्देशाने सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीत व इतर पोलीस ठाणे हद्दीत सराईत गुन्हे करणारा गुन्हेगार नामे गणेश उर्फ दाद्या इंद्रजित काळे (वय-२९ वर्षे रा. पारधी कॅम्प, अश्विनी हॉस्पिटल समोर, कुंभारी, ता.द. सोलापूर) याला सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आलंय.

 गणेश उर्फ दाद्या काळे हा परिसरात चोरी करणे, घरफोडी करुन सदर परिसरातील लोकांच्या मालमत्तेस हानी पोहचविणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे एकूण १३ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्याविरूध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१) (अ) (ब) प्रमाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ, सोलापूर शहर यांचे आदेश पारित झाले होते. 

त्यास शुक्रवारी, २६ जुलै रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशनकडून ताब्यात घेऊन सोलापूर शहर व उर्वरित सोलापुर जिल्हा व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आलेले आहे. त्यास तडीपार केल्यानंतर दर्गासिर पारधी कॅम्प, मादन हिप्परगा (ता.आळंद जि. कलबुर्गी) येथे सोडण्यात आलंय. आगामी काळात विविध जातीधर्माचे सण-उत्सव, मिरवणुका व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहर व परिसरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, म्हणून ही कारवाई करण्यात आलीय.

ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त (विभाग - ०२) यशवंत गवारी, विजापुर नाका पोलीस ठाण्याचे वपोनि दादा गायकवाड, दुपोनि संगीता पाटील, सपोनि शितलकुमार गायकवाड, पोशि/१४८९ रमेश कोर्सेगांव यांनी पार पाडली.