परभणी : सोलापूर चे गायक तथा महागायक विजेते मोहम्मद अयाज यांचा परभणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मोहम्मद अयाज यांचा गौरव करण्यात आला. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी १७ - परभणी लोकसभा मतदारसंघ तर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात कार्य गौरव सोहळा तसेच मोहम्मद अयाज प्रस्तुत स्वर गंध संगीत संध्या चे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात मोहम्मद अयाज आणि सहकाऱ्यांनी विविध रंग-ढंगाची अनेक गीत सादर करुन उपस्थितांना भारावून टाकले. निसर्गाच्या सानिध्यात बाहेर पाऊस झडी होती तर आत मोहम्मद अयाज रिमझिम के गीत गात जणू काही संगीत ताल-सुरांची सुरीली उधळणच अनुभवायला मिळाली. यावेळी परभणी चे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते मोहम्मद अयाज यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, अपर जिल्हाधिकारी प्रताप काळे, उपजिल्हाधिकारी जीवराज डापकर, उपजिल्हाधिकारी संगीता सानप, उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते . उपजिल्हाधिकारी शैलेश लाहोटी, दत्तू शेवाळे, अपर पोलीस अधीक्षक काळे सह सेकडो अधिकारी वर्ग उपस्थित होते.