सोलापूर : कंबरेला लावलेले हत्यार दाखवत मित्राच्या घरात घुसलेल्या तरूणानं त्याचा मित्र जावेद ला ' तेरे को नही छोडता, तुम्हारे पुरे खानदान को एक-एक करके मारता ' अशी धमकी दिलीय. ही घटना मजरेवाडी परिसरातील साईनाथ नगर (भाग-दोन) मध्ये शनिवारी दुपारी बारा वा. च्या सुमारास घडलीय. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सलमान गुड्डुभाई पटेल (रा. विष्णु नगर-२, मजरेवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, विष्णुनगर भाग दोन मधील रहिवासी सलमान पटेल याचा मित्र जावेद याच्याशी मैत्री आहे. त्यातच उभयतांमध्ये पूर्व वैमन स्यातून मतभेद झाल्याने सलमान पटेल यांनी त्याच्या कमरेला मोठं हत्यार लावून, त्याच्या घरात घुसला. त्याने मित्र जावेदला ' तेरे को नही छोडता, तुम्हारे पुरे खानदान को एक-एक करके मारता ' अशी धमकी दिली.
त्याच्या गोंधळामुळे जावेद च्या घरासमोर बघ्यांची मोठी गर्दी जमली. मुजावर कुटुंबाला प्राणघातक शस्त्र सोबत घेऊन धमकी देत असताना गर्दीतील काही लोकांनी मिळून त्याला पकडले व त्या घरातून बाहेर काढून घेऊन गेले. याप्रकरणी अ. रहिमान अब्बास मुजावर (वय- ३३ वर्षे, रा. ६१, बी साईनाथ नगर भाग-२, मजरेवाडी) यांनी शनिवारी सायंकाळी फिर्याद दाखल केली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात भा न्या सं ३३३,३५१ (२), (३), भा. ह. का ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सोळंके या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.