Type Here to Get Search Results !

शिक्षण विभागाच्या वतीने मुख्याध्यापक लिंबराज जाधव यांच्यासह सेवानिवृत्तांचा सत्कार


सोलापूर : जिल्हा परिषद सोलापूर, शिक्षण विभाग पंचायत समिती, दक्षिण सोलापूर च्या वतीने सेवानिवृत्तीनिमित्त जि. प. शाळा, उळे शाळेचे केंद्रीय मुख्याध्यापक लिंबराज जाधव यांचा परीक्षा परिषद, पुणे चे उपायुक्त संजय राठोड  व दक्षिण सोलापूर चे गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी राठोड यांनी आनंदी कसे जगावे, याबाबत मनोगत व्यक्त केले.

सेवानिवृत्त शिक्षकातून लिंबराज जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. दक्षिण प्रशासनाच्या वतीने या कार्यक्रमाचे सुंदर नियोजन करण्यात आले, त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद व्यक्त केले.


यावेळी राजशेखर नागणसुरे, गुरूबाळ सणके, अंकुश काळे, विस्तार अधिकारी जयश्री सुतार मॅडम यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अंजली जमखंडी यांनी केले तर जयश्री सुतार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.