सोलापूर : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत पक्षाने घवघवीत यश संपादन केले, या निमित्ताने सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या वतीने, ०८ जून रोजी शहर कार्यकारिणीच्या झालेल्या बैठकीमधील ठरावानुसार पक्षातील निवडून आलेले सर्व ८ खासदारांचा व २ उमेदवारांचा राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या शुभहस्ते सत्कार करण्याचे ठरले होते. त्यानुसार भव्य सत्कार समारंभ सोहळा आयोजित करण्याचा संयोजकांचं नियोजन आहे.
या कार्यक्रमास अनुमती व वेळ मिळावा, म्हणून सोलापूर शहरातील पक्षाचे ज्येष्ठ नेते शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी, ०६ जुलै रोजी बारामती येथे शरदचंद्र पवार यांची भेट घेऊन या कार्यक्रमासंदर्भात चर्चा करून अनुमती घेण्यात आली.
यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी महापौर महेश कोठे, प्रदेश उपाध्यक्ष माजी महापौर अॅडवोकेट यू. एन. बेरिया, माजी महापौर नलिनी चंदेले उपस्थित होते.