Type Here to Get Search Results !

कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांचा सन्मान... ! कृषी विभागाची प्रत्येक योजना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचे करावं नियोजन : संदीप कोहिनकर


 

सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या संपन्न होतील. तरी कृषी विभागाने यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी केले.

माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीच्या निमित्ताने कृषी दिन साजरा केला जातो, त्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा परिषद कृषी विभाग, महाराष्ट्र शासन व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने बहुउद्देशीय सभागृह जुने जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी अतिशय उत्साहात कृषी दिन साजरा करण्यात आला.

याप्रसंगी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मनीषा आव्हाळे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दत्तात्रय गावसाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे होते. मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्रीमती मीनाक्षी वाकडे या प्रमुख उपस्थित होते.

या कार्यक्रमात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सन्मान सोहळा या ठिकाणी करण्यात आला. जिल्ह्यात कमी कालावधीत विहीर पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांचे पूर्णत्वाचा दाखला वितरण, त्याचप्रमाणे या  कीटकनाशक व फवारणी करताना घ्यावयाची काळजी याची अभिनंदन पाटील यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले, 

त्याचबरोबर सेंद्रिय शेती हुरडा ज्वारी काशिनाथ भातगुनकी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तूर लागवड व सोयाबीन लागवड या विषयावर डॉ. लालासाहेब तांबडे त्याचप्रमाणे जिवाणू खत व्यवस्थापन या विषयावर डॉ. डी व्ही. इंडी (जीवशास्त्रज्ञ) यांचे शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.



शासनाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या वतीने शेतकरी पिक स्पर्धा यामध्ये राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा व महिला शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर कृषी विभाग जिल्हा परिषद व शासन स्तरावरील ज्यांनी उल्लेखनीय कामकाज केले, असे अधिकारी- कर्मचाऱ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी जयश्री गजेंद्र पाटील, होनमुटे, अंजली मेत्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेतकरी बचत गटांना प्रात्यक्षिक किट वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रास्ताविक नंदकुमार पाचकुडवे यांनी केले तर श्रीमती शितल चव्हाण,संचालक आत्मा व मदन मुकणे,संचालक स्मार्ट प्रकल्प राजकुमार मोरे उपसंचालक यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्रशासन अधिकारी विवेक लिंगराज, कृषी अधिकारी कल्याण श्रावस्ती यांनी केले, तर उपविभागीय कृषी अधिकारी श्रीमती मनीषा मिसाळ यांनी आभार प्रदर्शन केले. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कृषि अधिकारी सागर बारावकर, मोहिम अधिकारी अशोक मोरे, रामचंद्र माळी, अंबिका वाघमोडे, मिथुन भिसे, राजश्री कांगरे, महानंदा कुंभार, उमेश काटे, शंकर पाटील, सुरेश राठोड, मल्लिनाथ स्वामी, शंकर पाथरवट, लक्ष्मण वंजारी, हरूनपाशा नदाफ, श्रीकांत कोष्टी, ओमप्रकाश कोकणे, शंकर पाटील, रोहित शिंदे, राम कांबळे आदींनी परिश्रम घेतले.