वीरशैव व्हिजन तर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप
सोलापूर : आजमितीला समाजात अनेक प्रश्न आहेत. शासन व प्रशासन त्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचू शकत नाही. समाजातील सामाजिक संस्थांमुळे काही प्रश्न सुटण्यास मदत होते. त्यामुळे सामाजिक संस्थांची आज समाजाला गरज निर्माण झाली आहे. गेल्या बारा वर्षापासून वीरशैव व्हिजन करीत असलेले काम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन श्री सरस्वती मंदिर शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष सुधीर देव यांनी केले.
वीरशैव व्हिजनतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर श्री सरस्वती मंदिर संस्थेच्या कार्यवाह प्रिती चिलजवार, मुख्याध्यापिका जयश्री राठोड, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, कोषाध्यक्ष आनंद दुलंगे, सहकोषाध्यक्ष विजयकुमार बिराजदार, विश्वस्त सोमेश्वर याबाजी, चिदानंद मुस्तारे, सहकार्याध्यक्ष राजेश नीला, श्रीमंत मेरू, सोमनाथ चौधरी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही लक्ष्मीबाई किर्लोस्कर प्राथमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना ८० स्कूल बॅग व कै. गीताई गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या स्मरणार्थ श्री नाथ संस्थान, औसा यांचेकडून २५ डझन वह्या देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयालक्ष्मी दुलंगे यांनी तर जयश्री राठोड यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैशाली कोळी, प्रतिभा गायकवाड, वैशाली मेलगिरी, मनीषा पतंगे, गीतांजली लवटे, सुरेखा कोरे यांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळी : वीरशैव व्हिजनतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप प्रसंगी सुधीर देव, प्रिती चिलजवार, जयश्री राठोड, राजशेखर बुरकुले, आनंद दुलंगे, विजयकुमार बिराजदार, सोमेश्वर याबाजी, चिदानंद मुस्तारे, राजेश नीला, श्रीमंत मेरू, सोमनाथ चौधरी छायाचित्रात दिसत आहेत.