सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रशासनातील विविध अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झालंय. ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांचा कार्यकाल पूर्ण केला, त्यांची बदली करण्यात आली. यानुसार सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिस दलातील ०५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. सोलापूर ग्रामीण पोलिस दलाचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी यासंदर्भात आदेश काढले.
पोलीस अधीक्षकांच्या बदली आदेशानुसार नामदेव शिंदे सोलापूर तालुका पोलिस ठाण्यातून जिल्हा विशेष शाखा, महेश ढवण यांची पंढरपूर मंदिर समितीतून मंगळवेढा येथे, रणजित माने यांची मंगळवेढ्याहून पंढरपूर मंदिर समितीसाठी, पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे यांची सुरक्षा शाखेतून बार्शी शहर, मानव संसाधन शाखेतील राहुल देशपांडे यांच्याकडे सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचा पदभार देण्यात आलाय.