Type Here to Get Search Results !

रोटरी क्लब ऑफ सोलापूर अध्यक्षपदी सी.ए. सुनिल माहेश्वरी तर सचिवपदी ब्रिजकुमार गोयदानी



माजी प्रांतपाल डॉ. अनिल परमार यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी पदग्रहण समारंभ

सोलापूर : रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या वर्ष २०२४-२५ सालाकरीता अध्यक्षपदी रोटे. सी. ए. सुनिल माहेश्वरी तर सचिवपदी रोटे. ब्रिजकुमार गोयदानी यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती मावळते अध्यक्षा डॉ. ज्योती चिडगुपकर यांनी दिली. 

पदग्रहण समारंभ शनिवारी, ०६ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वा.गुजरात भवन येथे  होणार असून या सोहळ्यास  रोटरी जिल्हा ३१३१ चे माजी प्रांतपाल डॉ. अनिल परमार (न्यु पनवेल) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सहाय्यक प्रांतपाल रोटे. सौ. पुनम देवदास या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील, असं डॉ. ज्योती चिडगुपकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

ह्यावर्षी रेन वॉटर हार्वेस्टिंग ,आरोग्य तपासणी शिबीर , वरीष्ठ नागरीकांकरीता साक्षरता अभियान, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता अभियान, किचन  गार्डनींग, वृक्षारोपणासह , रक्तदान शिबीर, नुकतेच आंतरराष्टीय रोटरीद्वारे प्राप्त ५०७१० डॉलर्सचा निधीद्वारे रोटरी रेडक्रॉस द्वारे थॅलेसेमीयाग्रस्त रुग्णांकरीता जनजागृती, सल्ला व समुपदेशन, आदी कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर  राबविण्याचा मानस नुतन अध्यक्ष रोटे. सी.ए. सुनिल माहेश्वरी यांनी यावेळी व्यक्त केला. 

शिवाय रोटरी फौंडेशन ग्लोबल ग्रांट द्वारे यावर्षी कॅन्सर स्क्रिनिंग आणि जागृतीसाठी मोबाईल वाहन आणण्याचा आणि किडनी रोग्यांसाठी डायलेसिस सेंटर उभारण्याचा निर्धारही नुतन अध्यक्ष माहेश्वरी यांनी व्यक्त केला.

रोटरी क्लब सोलापूरद्वारा अन्नपूर्णा योजनेंतर्गत गेली १७ वर्षांपासून १०० वयोवृध्द गरजूंना दररोज एक वेळचे जेवण दिले जाते. तसेच कायमस्वरुपी रेडक्रॉस रोटरी केंद्रद्वारे अत्यंत अल्प दरात जयपूर फूट बसविले जातात. याशिवाय सायकल बँक प्रकल्पांतर्गत  गरजू मुलींना सायकल वाटप करण्यात येत आहे. या सायकली मुलींंचे शिक्षण होईपर्यंत त्यांच्याकडेच राहतात व नंतर अन्य गरजूंना देण्यात येतात. रोटरी नाना नानी पार्क, रोटरी पॉल हॅरिस स्मृती वन, रोटरी काव्यश्रृष्ठी आदी कायमस्वरुपी प्रकल्प रोटरी क्लब सोलापूर द्वारे राबविले जात आहेत. 

नुतन अध्यक्ष रोटे. सीए सुनिल माहेश्वरी  हे ऑटोमोबाईल आणि सिमेंट व्यवसाईक आहेत. ते डी एच बी सोनी कॉलेज, एम सर्कल आदी संस्थांवर कार्यरत आहेत. सचिव ब्रिजकुमार  गोयदानी हे टेक्सटाईल उत्पादक असून माहेश्वरी विकास मंडळ सोलापूरचे सक्रिय सदस्य आहेत.

नुतन संचालक मंडळात उपाध्यक्ष व प्रेसिडेंट इलेक्ट २०२५-२६- सौ. धनश्री केळकर,  सहसचिव - निलेश फोफलिया, खजिनदार - मितेश पंचमिया , आयपीपी-  डॉ. ज्योती चिडगुपकर, क्लब लर्निंग फॅसिलीटेटर - बी. एस. मुंदडा, सार्जंट ऍट आर्म्स - सीए राजगोपाल मिणीयार, संचालक सर्वश्री कौशिक शाह, शिवाजी उपरे, सौ. विद्या मणुरे, सौ. पारुल पटेल, गोवर्धन चाटला, विशाल वर्मा, आनंद गुंड्याल, सुरज तापडिया, सलाम शेख, डॉ. प्रत्युश कावरा  व संपादक श्रीकृष्ण गलगली व संदीप जव्हेरी यांचा समावेश आहे.

या पत्रकार परिषदेस जयेश पटेल, सलाम शेख आदी उपस्थित होते.