Type Here to Get Search Results !

एकमेकांच्या भावनाचा आदर करून उत्सव शांततेत पार पाडावे : पोलीस आयुक्त एम. राजकुमार


सोलापूर : मोहरम उत्सव साजरा करीत असताना नियमांचे पालन करून उत्सव शांततामय वातावरणात पार पाडावा, तसेच  त्याच दिवशी आषाढी एकादशी व मोहरम एका दिवशी असल्याने एकमेकांचे भावनाचा आदर करून उत्सव शांततेत पार पाडावे, असे आवाहन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी केले.

मोहरम उत्सवाचे अनुषंगाने सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुरुवारी, ०४ जुलै रोजी ११.०० वा. पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी, शांतता समिती सदस्य, सोलापूर महानगरपालिकेकडील अधिकारी, शहर काझी, मुस्लीम धर्मगुरु, मौलाना, शहरातील प्रमुख मस्जिदचे विश्वस्थ, यांची पोलीस आयुक्त कार्यालय येथे संयुक्तपणे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त एम. राजकुमार होते.

सदर बैठकीची प्रस्तावना पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीमती डॉ. दिपाली काळे यांनी करुन बैठक आयोजन करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. मोहरम उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणीही, कोणत्याही प्रकारे जबरदस्तीने वर्गणी/देणगी मागू नये, सर्व पंजे, सवारी, डोले स्थापन करणाऱ्यांनी आपली नोंदणी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे करावी, सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर मंडप मारताना सार्वजनिक रस्त्याचा २/३ भाग मोकळा सोडावा, पंजे/सवारी संरक्षणाकरीता प्रत्येकांनी आपलेकडील स्वयंसेवक नेमावेत, मोकाट जनावरांपासून पंजे/सवारी यांस धोका होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, कोणीही विनापरवाना मिरवणूक काढणार नाही, मिरवणूक मार्गावरील धार्मिक स्थळे विशेषःत लहान मोठी मंदिरासमोर नाच-गाणी करू नयेत अथवा मंदिरांवर आक्षेपार्ह चिज वस्तू फेकू नये, नागरीकांनी कोणत्याही स्थितीत चुकीच्या अफवांवर विश्वास न ठेवता सामंजस्याने वागावे, असं प्रास्ताविकात म्हटले.



मोहरम साजरा करतेवेळी दहा दिवस ठिकठिकाणी सरबत वाटप करतात. सरबत वाटप करताना सार्वजनिक रस्त्यावर अडथळा होऊ नये, याची खबरदारी घ्यावी, सोशल मिडीयाद्वारे कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह मेसेजेस, फोटो, व्हिडीओ फॉरवर्ड न करता ते डिलीट करुन जातीय सलोखा अबाधित राखावा. एखादी अप्रिय अथवा चुकीची घटना आजूबाजूला घडत असल्यास स्थानिक पोलीस ठाणे किंवा नियंत्रण कक्ष येथे त्वरीत माहिती द्यावी. कोणत्याही धार्मिक स्थळी आक्षेपार्ह भाष्य/वक्तव्य केले जाणार नाही, याची संबंधितांनी खबरदारी घ्यावी. उपरोक्त सुचनांचे पालन करुन कायदा व सुव्यवस्था राखणेकामी सर्वांनी सहकार्य करावे, असं आवाहनही श्रीमती डॉ. काळे यांनी केले.

त्यानंतर बैठकीस उपस्थित शांतता समिती सदस्य व इतरांनी समस्या/सुचना मांडल्या. त्यानंतर सदर सुचनेचे संबंधित महानगर पालिका अधिकारी यांनी सदर कामाची रुपरेषा बघून समस्या सोडविण्यात येतील, असे सांगितले. पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी बैठकीस उपस्थित लोकांचे स्वागत करुन मांडलेल्या अडी-अडचणीचे निरसण केले. 

उत्सव साजरा करताना बऱ्याचवेळी कायदेशीर बाबींचे उल्लंघन होत असते, कोणीही कायदा हातात घेऊ नये, कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलीसांशी संपर्क साधावा, शांतता समिती सदस्य व नागरीकांनी आपल्या परीसरातील बेकायेदशीर बाबींची माहिती पोलीसांना दिली पाहिजे. मोहरम उत्सवानिमित्त शुभेच्छा देऊन पोलीस आयुक्तांनी बैठकीला उपस्थितांचे आभार मानले.

या बैठकीस पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) अजित बोऱ्हाडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) मा. श्रीमती डॉ. दिपाली काळे, पोलीस उप आयुक्त (परीमंडळ) विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (विभाग-१) अशोक तोरडमल,  (विभाग-२) अजय परमार, वाहतुक शाखा- यशंवत गवारी, श्रीमती. प्रांजली सोनवणे ( गुन्हे शाखा), माने (प्रशासन) तसेच सोलापूर महानगरपालिका उपआयुक्त संदिप कारंजे, नगर अभियंता श्रीमती सारिका अकुलवार, महावितरण अति. कार्यकारी अभियंता प्रदिप मोरे, धर्मादाय कार्यालयाकडील असिफ शेख, तसेच सर्व पोलीस ठाणे/शाखा प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार, व शांतता कमिटीचे सदस्य, व पत्रकार बंधु उपस्थित होते.