रूग्णांनी आरोग्याबरोबर डोळ्यांचीही घ्यावी काळजी : डॉ. शरद जाधव
सोलापूर : रुग्ण आरोग्याची काळजी घेतात, पण डोळ्याची शक्यतो काळजी घेत नाहीत. डोळा हा माणसाचां महत्त्वाचा भाग आहे. डोळ्याने जर कमी दिसायला लागले तर जीवन जगणे मुश्किल होते. स्वावलंबी जीवन परावलंबी होते. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेत असताना डोळ्याचीही निगा राखणे गरजेचे आहे, असे मत नेत्रचिकित्सक डॉ. शरद जाधव यांनी व्यक्त केले.
दैनिक पुण्यनगरीच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त व यशवंत कृषी केंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या वतीने मोहोळ तालुक्यातील शिरापूर (सो) येथील हनुमान मंदिरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या नेत्र शिबिरात डॉ. जाधव हे बोलत होते. विठ्ठल-रुक्मिणी मातेचे डॉ. श्रीकांत जाधव यांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या शिबिरामध्ये १७६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १०५ रुग्णांवर मोफत औषध उपचार करण्यात आले तर ७१ रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयामध्ये करण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या वतीने डॉ. श्रीकांत जाधव, डॉ. निलेश बागुल ,डॉ. रोहन सोमाणी, डॉ शुभम दरेकर, डॉ. रवी चोरगे यांनी रुग्णांची तपासणी केली, तर त्यांना अभिजीत जाधव, रणधीर महेंद्रकर यांनी मदत केली. कार्यक्रमास पुण्यनगरीचे वृत्तसंपादक रघुवीर शिराळकर, उपसंपादक शरीफ सय्यद, शिरापूर (सो)प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जिलानी खान, शिरापूरच्या सरपंच वृषाली सावंत, उपसरपंच सौदागर साठे, बाळासाहेब हारदाडे, सागर काळे, ह.भ. प. अशोक काळे महाराज, औदुंबर मसलकर, विठ्ठल गावडे, दत्ता साठे, बापू निकम, आरोग्य सहायिका अनुराधा माडेकर-बारगळ, आरोग्यसेविका सरस्वती ढगारे, शुभांगी गुरव, भाग्यश्री वाघचौरे, कल्याणी कोळी, सत्यभामा कोळी, कल्पना राजेपांढरे, सुरेखा मारडकर, राणी घरबुडे, अमोल आदमने, अमोल सावंत, रविराज चव्हाण, गोरख चव्हाण, मच्छिंद्र चव्हाण आधीसह शिरापूर (सो) ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.... चौकट .. ....
... यांचं लाभलं सहकार्य
या शिबिराचे आयोजन पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांनी केले होते. यासाठी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज सर्व उपचार रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ. संजीव ठाकूर, सहयोगी प्राध्यापक डॉक्टर, डॉ. विठ्ठल धडके, मॅन काईंड फार्मा कंपनीचे व्यवस्थापक अविनाश शिराळकर, अक्षर राजेश्वर ,सुधाकर शितोळे, बाळासाहेब हारदाडे आदींचे सहकार्य लाभले.