सोलापूर : सैनिक कल्याण विभागाची वेबसाईट डीजीटीलायझेशन करावयाची असल्याने जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक/माजी सैनिक विधवा/अवलंबितांनी आपल्या जवळच्या ई-सेवा केंद्रात जाऊन रजिस्ट्रेशन करावे व त्याची एक प्रत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर येथे माहितीस्तव जमा करावी.
तसेच नवीन सेवानिवृत्त होणाऱ्या माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून ओळखपत्र प्राप्त करणेसाठी सर्वप्रथम आपल्या जवळच्या ई-सेवा केंद्रात जाऊन के एस बी (Ksb)वेबसाईट वर आपला अर्ज भरावा व त्याची एक प्रत व अपलोड केलेली सर्व मुळ कागदपत्रे कार्यालयात सादर करुन आपले ओळखपत्र मिळण्यास मागणी करावी, वरील प्रमाणे कार्यवाही लवकरात लवकर करणेचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी केले आहे.