कारगिल विजय योद्धा जगन्नाथ इंगळे यांचा संभाजी ब्रिगेड च्या वतीने सत्कार
सोलापूर : कारगील युद्धात मी सहभागी होतो, अनेक शत्रूंचा खत्म केला. नजीक बॉम्ब पडल्याने मी जखमी झालो तरी निकराने पाकिस्तानला पराभव करण्यात आम्ही मोलाचा वाटा उचलला. माझे तिन्ही भाऊ सैन्य दलात असून भारतीय देशाची सेवा करण्याची भाग्य आम्हाला मिळाले, असे मनोगत जगन्नाथ इंगळे यांनी व्यक्त केले.
भारत-पाकिस्तान यांच्यात जुलै १९९९ रोजी कारगिल युद्ध झाले. या युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला. कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभागी असलेले वीर जवान जगन्नाथ इंगळे यांचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. कारगिल विजय युद्धाला २५ वर्षे पूर्ण झाल्याने जुळे सोलापूर येथील संभाजी ब्रिगेड संपर्क कार्यालयात मेजर जगन्नाथ इंगळे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, उपाध्यक्ष सिताराम बाबर, रुपेश कीरसावंळगी, तेजस शेळके, सुलेमान पिरजादे, युवराज ताकमोगे, विनायक मोती, रमेश चव्हाण, श्रीशैल बोरोटे, महेश भंडारी, विजय बिल्लेगुरु आदि उपस्थित होते.