Type Here to Get Search Results !

आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेसचा बहुप्रतिक्षित अँथे २०२४ शिष्यवृत्ती परिक्षेच्या तारखा घोषित; ऑनलाईन नोंदणीस प्रारंभ


सोलापूर : आकाशच्या देशभरातील सर्व केंद्रांवर अन्थे (आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम) परिक्षेसाठी गतवर्षी ११.८० लाख परिक्षार्थींची नोंदणी झाली होती, यंदा देशभरात १५ लाख विद्यार्थी परिक्षेला बसतील. ही ऑफलाइन परीक्षा सर्व ३१५ हून अधिक केंद्रांवर २० आणि २७ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत ऑफलाइन परीक्षा होणार असल्याची माहिती असि. डायरेक्टर दीपक सिक्रोरिया यांनी शुक्रवारी दुपारी एका पत्रकार परिषदेत दिली.

आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लि. ने (AESL) आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम (ANTHE) या आपल्या प्रमुख शिष्यवृत्ती परीक्षेची १५ गौरवशाली वर्षे पूर्ण केली असून, या वर्षीच्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेची घोषणा केली आहे. ही परिक्षा ऑनलाइन परीक्षा १९ ते २७ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत केव्हाही देता येतील. यासाठी विद्यार्थी त्यांच्या सोयीचा एक तासाचा स्लॉट निवडू शकतात. ही एक तासाची चाचणी असेल ज्यामध्ये एकूण ९० गुण असतील. आजपासून शुक्रवारी, २६ जुलैपासून नोंदणीस प्रारंभ झाला असून १५ ऑगस्टपर्यंत नोंदणी ५० टक्के नोंदणी शुल्कात सवलत देण्यात येणार असल्याचे डायरेक्टर दीपक सिक्रोरिया यांनी प्रारंभी सांगितले.



यावेळी पत्रकारांशी बोलताना दीपक सिक्रोरिया पुढे म्हणाले, गेल्या वर्षी ११.८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्याचा विक्रम अनेक टॉपर्सनी (नीट युजी, जेईई मेन आणि अॅडव्हान्सड) अँथेसह त्यांचा प्रवास सुरू केला. शंभर टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती उपलब्धता असून  इयत्ता सातवी ते नववीमधील सर्वोत्कृष्ट १०० विद्यार्थ्यांना आणि इयत्ता अकरावी आणि बारावीतील सर्वोत्कृष्ट ५० विद्यार्थ्यांना रोख पुरस्कार देण्यात येणार आहेत. पाच विद्यार्थ्यांना अमेरिकेतील केनेडी स्पेस सेंटर येथे पाच दिवसीय मोफत सहल जिंकण्याची संधी या परिक्षेच्या माध्यमातून मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.

नोंदणी खुली असून विद्यार्थी किंवा पालक anthe.aakash.ac.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात किंवा त्यांच्या शहरातील आकाशच्या जवळच्या केंद्राला भेट देऊ शकतात, असंही दीपक सिक्रोरिया यांनी शेवटी सांगितले.

या पत्रकार परिषदेस ब्रॅन्च हेड सर राहुल बोद्दुल, अकॅडमिक हेड मेडिकल सुनिल राऊत आणि अकॅडमिक हेड विष्णु कुमार महावर उपस्थित होते.