सोलापूर : जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांचं शुक्रवारी, २६ जुलै रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते छत्रपती संभाजी नगरमध्ये व्यास्तव्यास होते. सोलापूर जिल्हा परिषदेमधून मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून बदली झाल्यानंतर त्यांना काही दिवसानंतर उद्योग विभागाच्या आयुक्तपदी पोस्टिंग मिळाली होती. मागील चार महिन्यांपूर्वीच ते उद्योग विभागाच्या आयुक्त पदावरून निवृत्त झाले होते. त्यांच्या निधनावर अनेकांनी दुःख व्यक्त केलंय.