महिला व बालकल्याण विकासमंत्री आदिती तटकरे यांनी केलं जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या कार्याचे विशेष कौतुक
सोलापूर : सोशल मीडिया विभागाच्या वतीने आयोजित अजित पर्व चषक बक्षीस वितरण समारंभासाठी सोशल मीडिया शहर जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे यांनी मंत्री अदिती तटकरे, आमदार सुनील शेळके, प्रदेश युवक अध्यक्ष सुरज चव्हाण यांना सोलापूरला येण्याचे निमंत्रण दिलंय. या निमंत्रणाला आदिती तटकरे , आमदार सुनील अण्णा शेळके, प्रदेश युवक अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय.
पुणे बाणेर येथे सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाची बैठक महिला व बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मावळचे आमदार सुनील शेळके, प्रदेश युवक अध्यक्ष सुरज चव्हाण सोशल मीडिया विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. आगामी विधानसभा व स्थानिक स्वराज्य निवडणुका संदर्भात पुढील दिशासंदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस राज्यातील जिल्हाध्यक्षांना व कार्याध्यक्षांना महत्त्वाचे आमंत्रण देण्यात आले होते. सोलापूर विभाग सोशल मीडियाचे शहर-जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे यांनाही विशेष आमंत्रण देण्यात आले होते.
त्यानुसार सोशल मीडिया विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे व कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे यांनी या बैठकीस उपस्थिती लावली. राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त व जनविश्वास सत्ता अंतर्गत जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार व कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांच्या नेतृत्वात विविध कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आलं आहे.
या अशा विविध स्तुत्य उपक्रमांची माहिती व सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाने घेतलेल्या विविध अशा उपक्रमांची ही माहिती कार्य अहवालाद्वारे सोशल मीडिया विभाग शहर जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे कार्याध्यक्ष, सोमनाथ शिंदे यांनी महिला व बाल कल्याण विकास मंत्री आदिती तटकरे , आमदार सुनील शेळके, प्रदेश युवक अध्यक्ष सुरज चव्हाण, सोशल मीडिया प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांना दिली.
यावेळी महिला व बाल कल्याण विकास मंत्री आदिती तटकरे,आमदार सुनील शेळके, प्रदेश युवक अध्यक्ष यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभाग यांनी घेतलेल्या अशा अनोख्या उपक्रमांचा विशेष कौतुक केलं. तसेच जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच जनविश्वास सप्ताह अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे विशेष कौतुक केले.
समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करून या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार व खा. तटकरे यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचण्याची काम संतोष पवार व जुबेर बागवान यांनी केले आहे. व महाराष्ट्रात एक वेगळा आदर्श या निमित्ताने प्रस्थापित केला आहे, असे गौरवोद्गार मंत्री आदिती तटकरे यांनी केलं.
यापुढे देखील अशाच पद्धतीने समाज उपयोगी कार्यक्रम हाती घेऊन सोलापुरातील सर्व क्षेत्रातील गुणवंतांना व त्यांच्या कलांना प्रोत्साहन देण्याचे काम संतोष पवार व जुबेर बागवान यांनी करावं आणि ते करत राहतील याची मला खात्री आहे, असं आवाहनही तटकरे यांनी यावेळी केलंय.