सोलापूर : तरुण-तरुणींनी विवाहानंतर पहिले अपत्य झाल्यावर थांबावे. गरज असल्यासच दुसरे अपत्य होऊ देण्याचा विचार करावा, मुलगा किंवा मुलगी यांचा अट्टाहास धरू नये. कारण त्यामुळेच भारताची लोकसंख्या वाढत गेली. नैसर्गिक साधन संपत्तीवर ताण पडत गेला. आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक आरोग्य विषयक सुविधा अपुऱ्या पडू लागल्या. म्हणून देशाची अपेक्षित गतीने प्रगती होऊ शकलेली नाही. भारताची वाढती लोकसंख्या देशाच्या प्रगतीतला मुख्य अडसर ठरलेली आहे, असे प्रतिपादन फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. रत्नमाला देसाई यांनी केले.
त्या फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा व वालचंद शिक्षण समूह अंकित वालचंद कला व विज्ञान महाविद्यालय, हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या भव्य जनजागरण दिंडीचे आयोजन करण्यात आले होते, त्याच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. संतोष कोटी, प्राचार्य डॉ. सत्यजित शहा, प्राचार्य डॉ. अश्विन बोंदार्डे, प्राचार्य डॉ.राजशेखर हिरेमठ, डॉ. मल्लिनाथ देसाई, प्राचार्य डॉ. राम ढोले, प्राचार्य डॉ. एस. बी. क्षिरसागर, प्राचार्य डॉ. गायकवाड, डॉ. शिवाजीराव देशमुख, अश्विनी सहकारी रुग्णालयाचे संचालक अशोक लांबतुरे, फॅमिली प्लॅनिंगचे चेअरपर्सन प्रा. डॉ. एन. बी. तेली, व्हाईस चेअरपर्सन प्रा. डॉ. आयेशा रंगरेज, डॉ. विजया महाजन, इंडियन रेडक्रॉस सोसायटी सोलापूर शाखेचे चेअरमन डॉ. राजीव प्रधान, बालाजी अमाईन्स सी. एस. आर. विभागाचे प्रसाद सांजेकर, डॉ. अमोल शिंदे, डॉ. किरण चौगुले, डॉ. दत्ता वाघमारे, डॉ. रामचंद्र गोरे, डॉ. श्रीनिवास जगताप, राहुल हजारे, कॅप्टन संदीप पाटील आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बालाजी अमाईन्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी केले. सूत्रसंचालन सुगतरत्न गायकवाड यांनी केले. यावेळी डी. राम रेड्डी यांनी लोकसंख्या दिन जनजागरण दिंडीस शुभेच्छा दिल्या.
या दिंडीत वालचंद कला व विज्ञान महाविद्यालय, हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशन, एस. व्ही.सी.एस. ज्युनिअर कॉलेज, भवानी पेठ, एस. व्ही.सी.एस. अध्यापक विद्यालय, अक्कलकोट रोड, संगमेश्वर महाविद्यालय, वसुंधरा कला व विज्ञान महाविद्यालय, अश्विनी कॉलेज ऑफ नर्सिंग, ए. आर. बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय, शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलांचे, भाई छन्नुसिंह चंदेले कॉलेज ऑफ सोशल वर्क, हिराचंद नेमचंद कॉलेज एन. सी. सी. विभाग, श्रविका कॉलेज, छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालय, डी. ए. व्ही. वेलणकर कॉलेज ऑफ कॉमर्स, मंगळवेढेकर कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, डी. पी. बी. दयानंद कॉलेज ऑफ एज्युकेशन, नेटवर्क ऑफ सोलापूर बाय पीपल लिविंग विथ एच. आय.व्ही. एड्स, विहान प्रकल्प, क्रांती महिला संघ, सोलापूर जिल्हा सामाजिक कार्य समिती मायग्रंट, ट्रकर्स प्रकल्प, सखी वन स्टॉप सेंटर प्रकल्प, सारथी युथ फाऊंडेशन, इनरव्हील क्लब ऑफ सोलापूर स्टारलेट, दमाणी ब्लड सेंटर, सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंच व सोलापूर कॅन्सर सोसायटी आदी महाविद्यालयांचे १,५०० विद्यार्थी शिक्षक व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी दिंडीमध्ये सहभागी होते.
वालचंद महाविद्यालयाच्या प्रांगणातून दिंडीची सरुवात होऊन पुढे सत्यम चौक, साईबाबा चौक , अशोक मार्केट रोड, व्यंकटेश देवस्थान, मितांशु हॉस्पिटल, गायत्री क्लिनिक, व्यंकटेश निवास, उमेश फोटो स्टुडिओ, बोल्ली मंगल कार्यालय, रंगदळ निवास, पंचमुखी हनुमान मंदिर मार्गे पुढे जाऊन सांगता वालचंद महाविद्यालयाच्या प्रांगणात झाली. दिंडीत विद्यार्थ्यांनी 'लोकसंख्या शिक्षण व छोटे कुटुंब' यावरील घोषवाक्यांनी परिसर दणाणून सोडला होता. प्राचार्य डॉ. संतोष कोटी यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.