सोलापूर : बाहेर पडत असलेल्या पावसात आसरा मागून घरात घुसलेल्या वासनांधानं महिलेशी दुष्कर्म करून जीवे मारण्याची धमकी दिलीय. ही घटना कुंभारी परिसरातील विडी घरकुलात घडलीय. त्याच्या वासनेला सतत शिकार होत असलेल्या महिलेने पोलिसांकडे धाव घेत ' आप बिती' मांडलीय. त्यानुसार दाखल फिर्यादीनुसार बालाजी सत्यनारायण नल्ला याच्याविरुद्ध दुष्कर्म करून महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी वळसंग पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, विडी घरकुलात गेल्या १५ वर्षापासून वास्तव्यास असलेल्या महिलेच्या पतीचं सुमारे दीड महिण्यापूर्वी निधन झालंय. ती वैधव्यात तिच्या घरी एकटीच राहात असून, तिचा पती हयात असताना, पतीचा मित्र या नात्याने बालाजी नल्ला, त्या घरी काही वेळा आला होता.
सुमारे २० दिवसांपूर्वी ती तिच्या घरात एकटीच झोपली होती. त्यावेळी दरवाजा वाजल्याने तिने कोण आहे, अशी विचारणा केली. त्यावेळी बालाजी नल्ला असं नांव सांगत तेलुगु भाषेत पाऊस सुरु असल्याने, दरवाजा उघडा असे तेलगूमध्ये म्हटल्याने तिने दरवाजा उघडला. त्यावेळी त्यानं तिच्याशी बळजबरीने दुष्कर्म केले. त्यानंतर घडली घटना कोणाला सांगितली तर खल्लास करण्याची धमकी देऊन निघून गेला.
त्यानंतर सुमारे आठ दिवसांनी येऊन तिच्या इच्छेविरूद्ध शारिरीक जवळीक साधली. बालाजी नल्ला हा सारखा येऊन मला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यासोबत बळजबरीने वारंवार शरीर संबध करत असल्याचे तिने शेजारच्या तरुणाला सांगितले. त्यांनी धीर दिल्याने त्या महिलेने वळसंग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केलीय. त्यानुसार बालाजी सत्यनारायण नल्ला याच्याविरुध्द भारतीय न्याय संहिता (बी एन एस 2023) 64(2) (m), 333, 351(2) आणि 351(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय.