सोलापूर राष्ट्रवादी OBC सेल विभागाचा कल्याण आखाडे यांनी घेतला आढावा
सोलापूर : येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीचे सर्व फ्रंटल आणि सेलचे राज्य प्रमुख पक्ष संघटनेचा विस्तार करण्याकरिता राज्यभर दौरे करीत आहेत. त्याच अनुषंगाने OBC सेल चे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे हे सोलापूर दौऱ्यावर आले असता राष्ट्रवादी भवन कार्यालयात सोलापूर OBC विभागाची आढावा बैठक संपन्न झाली.
सुरुवातीला माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर कल्याण आखाडे यांचे OBC विभाग सेल अध्यक्ष अनिल छत्रबंद आणि कार्याध्यक्ष बाबू पटेल यांनी फेटा व पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार केला.
प्रास्ताविकात अनिल छत्रबंद यांनी प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे स्वागत केले. त्याचबरोबर OBC पक्ष संघटन अधिक बळकट करण्याकरता प्रयत्न करेन, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
OBC विभाग प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे: ओबीसी विभागामध्ये जवळपास 372 जाती असून सोलापूर शहर बहुभाषिक शहर आहे येथे बहुसंख्य ओबीसी समाज वास्तव्यास आहे या ओबीसी समाजापर्यंत आपण पोहोचून जास्तीत जास्त पक्ष संघटन मजबूत करण्यावर आपण भर द्यावा आणि अजितदादांचे हात बळकट करावेत याकरता आपण सर्वांनी प्रयत्न करावा असे आवाहन करत पक्ष संघटनेचा आढावा घेताना येणारा विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पुन:श्च मी या सोलापूर विभागाचा आढावा घेण्यासाठी येणार आहे, त्यावेळेस सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापली ताकद पणाला लावून जास्तीत जास्त संघटन उभे करावं, अशी सूचना यावेळी केली.
या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना ओबीसी प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करून शुभेच्छा देण्यात आल्या. या बैठकीच्या आयोजन ओबीसी संघटनेचे शहराध्यक्ष अनिल छत्रबंद, कार्याध्यक्ष बाबू पटेल यांनी केले होते . बैठकीचे सूत्रसंचालन सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी केले तर ओबीसी विभाग कार्याध्यक्ष बाबू पाटील यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, महिला आघाडी कार्याध्यक्ष चित्रा कदम, माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष बशीर शेख, OBC प्रदेश सचिव बसवराज बगले, OBCप्रदेश सरचिटणीस संतोष राजगुरू, OBC पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय कोळी, OBC प्रदेश संघटक शिवाजीराव येवारे, माजी नगरसेवक नारायण माशाळकर, महिला प्रदेश सचिव लता ढेरे, युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का, संघटक दत्तात्रय बडगंची, युवती अध्यक्ष किरण माशाळकर, विद्यार्थी अध्यक्ष पवनकुमार पाटील, अल्पसंख्यांक अध्यक्ष अमीर शेख, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष बेळेनवरु, कार्याध्यक्ष अनिल बनसोडे, वाहतूक सेल अध्यक्ष इरफान शेख, विधानसभा मध्ये अध्यक्ष अलमेहराज आबादी राजे, सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे, डॉक्टर सेल अध्यक्ष संदीप माने, कार्याध्यक्ष महेश वसगडेकर, उपाध्यक्ष हरिश्चंद्र गलियाल, दक्षिण विधानसभा महिला अध्यक्ष प्रिया पवार, महिला दक्षिण विधानसभा कार्याध्यक्ष कांचन पवार, प्राजक्ता बागल, सुरेखा घाडगे, उत्तर विधानसभा संघटक प्रकाश झाडबुके, प्रज्ञासागर गायकवाड, शामराव गांगर्डे, प्रकाश मोटे, शाहरुख पठाण, देव पोतदार यांच्यासह सर्वच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
... चौकट ...
...आपण जे पाहिलेले स्वप्न आहे, ते पूर्ण होईल
राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे छत्रपती शिवाजी महाराज , फुले, शाहू, आंबेडकर विचारसरणीचे नेते असून सर्व बहुजन समाजाला एकत्र घेऊन जाणार नेतृत्व आपल्याला लाभलं, हे आपले भाग्य आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात पाहिलं तर सर्व समाज घटकाला स्थान देऊन सन्मान केला आहे. अशा नेतृत्वाला भविष्यकाळात मुख्यमंत्री करण्याचे आपले जे स्वप्न आहे, ते स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्याकरता आपण सर्वांनी मेहनत घ्यावी. ज्या पद्धतीने कल्याण आखाडे राज्यभर फिरून पक्ष संघटनेचा विस्तार करण्याकरता रात्रंदिवस मेहनत घेत असून त्यांना सोलापूर शहरातील ओबीसी विभाग सेल शहराध्यक्ष अनिल छत्रबंद, कार्याध्यक्ष बाबू पटेल, प्रदेश उपाध्यक्ष बशीर शेख, प्रदेश सचिव बसवराज बगले या सर्वांनी त्यांना साथ द्यावी, मी आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान नेहमीच आपल्यासोबत असून आपण सर्वजण मेहनत घेतलात तर निश्चितच भविष्य काळात उपमुख्यमंत्री अजित पवार या राज्याचे मुख्यमंत्री होतील आणि आपण जे पाहिलेले स्वप्न आहे, ते पूर्ण होईल.
संतोष पवार, जिल्हाध्यक्ष.