सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेचे निष्क्रिय कामकाज व भ्रष्टाचार कारभारामुळे सोलापूरची दुरावस्था झालीय, यास कारणीभूत असलेल्या महाराष्ट्र शासन व म.न.प. प्रशासनाचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोलापूरच्या वतीने मंगळवारी, १६ जुलै रोजी सकाळी ११.३० वा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या (जुने) प्रवेशद्वारावर जनजागृती फलक आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शहर प्रमुख विष्णु कारमपुरी यांनी सामाजिक माध्यमावर दिलीय.
स्मार्ट सिटीच्या नावाखाली सुंदर सोलापूर ऐवजी बंदर सोलापूर कशी दुरावस्था झाल्याचे दिसत आहे. त्यास नागरिक कंटाळले आहेत. या समस्येला वाचा फोडण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांच्या मार्गदर्शनाखाली फलक जनजागृती आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे.
यावेळी सहसंपर्कप्रमुख उत्तम प्रकाश खंदारे, लोकसभाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, जिल्हाप्रमुख गणेश वानकर, जिल्हाप्रमुख अमर पाटील, जिल्हाप्रमुख अजय दासरी, महिलाआघाडी जिल्हा संघटिका प्रिया बसवंती, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय गणेशकर, उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील, शहरप्रमुख शरणराज केंगनाळकर, शहरप्रमुख महेश धाराशिवकर, शहरप्रमुख दत्तात्रय वानकर, युवासेना जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले, युवतीसेना जिल्हाप्रमुख पूजा खंदारे, युवतीसेना शहरप्रमुख रेखा आडकी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आले आहे.
तरी सोलापूर महानगरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संघटक, समन्वयक,विधानसभा प्रमुख, उपशहरप्रमुख, विभाग प्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख शिवसेना प्रणित महिलाआघाडी, कामगार सेना, विद्यार्थी सेना, रिक्षा सेना, शिक्षक सेना, वैद्यकीय कक्ष, कॉलेज कक्ष, आणि इतर सर्व संलग्न संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करावं, असं आवाहन महानगर प्रमुख विष्णू कारमपुरी यांनी केलंय.