Type Here to Get Search Results !

जनआधार फाऊंडेशनच्या रक्तदान शिबीरात १०७ रक्तदात्यांचे स्वयंस्फूर्तीने रक्तदान


मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना शिबीरासही मोठी गर्दी 

सोलापूर : येथील जनआधार फाऊंडेशनचे संस्थापक आनंद गोसकी यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू रूग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावं, या उदात्त हेतूने यंदाच्या वर्षीही   रक्तदान शिबीराचं आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात १०७ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून आनंद गोसकी यांना शुभेच्छा दिल्या. 

परीसरातील नागरिकांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे लाभार्थी रक्तदात्यांनी रक्तदान शिबीरात रक्तदान करून आनंद गोसकी यांचे अभिष्टचिंतन केले. आनंद गोसकी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून रक्तदान शिबीर आयोजनाचं यंदाचं सहावं वर्ष होतं.



साखर पेठेतील विणकर बागेसमोर रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते. या शिबीरस्थळी राज्य शासनाने लागू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना शिबीरात अर्ज करण्यासाठी साखर पेठ परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सिध्देश्वर ब्लड बँकेच्या वतीने यंदा रक्त संकलन करण्यात आले. 


याप्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी गणेश गुज्जा, भाजपा ज्येष्ठ नेते तुळशीदास भुतडा, लक्ष्मीकांत दंडी,नागेश सरगम, प्रशांत फत्तेपूरकर, अनिल कंदलगी, तुकाराम चाबुकस्वार यांच्यासह अनेक मान्यवरांनी रक्तदान शिबीरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शहराच्या विविध भागातून आलेल्या युवकांनी स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान केले. जनआधार फाऊंडेशनच्या वतीने आनंद गोसकी यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले.


यावेळी  शिबीरासाठी महेश दासी, शुभम मिठ्ठा, श्रीकांत येमुल, आकाश बुर्ला, किरण आंबट, शंकर म्हंता, दिनेश श्रीकोंडा, विनीत गोसकी, प्रणव संगा, अमर गंगुल, राजु तोलनूर, दिनेश सुरा, ऋषिकेश चिलवेरी आणि शाम कोटा यांनी परीश्रम घेतले.