' बामसेफ ' चे समर्पित कार्यकर्ते एम.ए.वाघमारे (सर) यांचं निधन

shivrajya patra

सोलापूर : येथील गुरुनानक चौक, गुरुदत्त हाऊसिंग सोसायटीतील रहिवासी एम.ए.वाघमारे सर यांचं वार्धक्यात उपचारादरम्यान बुधवारी, ३१  जुलै रोजी पुण्यात निधन झालंय. त्यांची अंत्ययात्रा  राहत्या घरापासून गुरुदत्त हौसिंग सोसायटी, गुरुनानक चौक, सोलापूर येथून सायंकाळी ७.३० वा. निघणार असल्याचे सांगण्यात आलंय.

बामसेफ संघटनेचे निष्ठावान, ईमानदार व समर्पित कार्यकर्ते अशी एम.ए.वाघमारे सर यांची सर्वदूर ख्याती होती. बामसेफ व सहयोगी संघटनेतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आलीय.


To Top