Type Here to Get Search Results !

'जनविश्वास सप्ताह' निमित्त ओंकार प्राथमिक शाळेत विद्यार्थी-पालकांची मोफत आरोग्य तपासणी


सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व  प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहरामध्ये 'जनविश्वास सप्ताह' साजरा होत आहे. त्या अंतर्गत म्हैत्रे वस्ती-कुमठा नाका, परिसर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेल व सागर गोरले मित्र परिवाराच्या वतीने ओंकार प्राथमिक शाळेत विडी कामगार व बांधकाम कामगार व त्यांच्या पाल्यासाठी आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जवळपास २५० लाभार्थ्यांची तपासणी झाली. शिबिर यशस्वीतेसाठी डॉ. संदीप माने, डॉ. महेश वसगडेकर, डॉ. अनिल भाकरे यांनी अथक परिश्रम घेतले.

प्रारंभी शिक्षण ज्योति सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या शुभहस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यानंतर विचारपीठावरील मान्यवरांचा सत्कार संपन्न झाला. डॉक्टर सेल विभाग अध्यक्ष डॉ. संदीप माने, कार्याध्यक्ष महेश वसगडेकर, डॉ. अनिल भाकरे, जयकुमार चाबुकस्वार, सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे, दशरथ शेंडगे-देशमुख, शाळेचे मुख्याध्यापक हरिदास गुरव यांची यावेळी उपस्थिती होती.



प्रास्ताविकात डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. संदीप माने यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश विशद केला. यावेळी 'एकच वादा अजितदादा, विकासाचा वादा अजितदादा' अशा घोषणांनी शालेय परिसर दणाणून गेला होता. 



उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 'जनविश्वास सप्ताह' अंतर्गत शहरात विविध ठिकाणी विविध कार्यक्रम जल्लोषात पार पडले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वंचित घटकासाठी, शालेय विद्यार्थ्यांसाठी, महिला, युवती, ज्येष्ठ नागरिकांसाठी, दिव्यांगांसाठी विविध योजनेचा माध्यमातून विकास साधण्याचे काम केले आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात ते निश्चितच मुख्यमंत्री होतील, असा विश्वास सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे यांनी त्यांच्या मनोगतात व्यक्त केला. 

याप्रसंगी सुखदेव शिंदे, श्रीकृष्ण भोसले, बाबुराव पाटील, सुकेशनी तडसरे, सुषमा होंदरणे, सावित्री गुरव, पुष्पराज तुक्कुवाले, किशन चौधरी, रोहित गोरले, जीवन वाघमोडे, योगेश झंपले, निखिल लंगडेवाले, यश बडूरवाले, दिनेश माने यांची उपस्थिती होती.