सोलापूर : डॉ. वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ए.आर.टी सेंटर,, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, निरामय आरोग्य धाम, संपूर्ण सुरक्षा कार्यक्रम , यांच्या संयुक्त विद्यमाने advocacy कार्यक्रम चे उद्घाटन वरिष्ठ स्तर न्यायाधीश (तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर) देवर्षी, डॉ. धडके नोडल अधिकारी ART Solapur, डॉ. तोडकर वैद्यकीय अधीक्षक, सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर, डॉ. अग्रजा चिटणीस वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी ए. आर.टी . सेंटर सोलापूर, भगवान भुसारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा एड्स नियंत्रण कार्यालय सोलापूर, सकट सुपरवायझर DAPCU सोलापूर, श्रीमती सीमा किणीकर संचालिका निरामय आरोग्यधाम, लालाजी जाधव, प्रकल्प संचालक एल डब्ल्यू एस प्रकल्प , अॅड. किणगी ज्येष्ठ विधीज्ञ ,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भालशंकर प्रकल्प अधिकारी ssks, महेश प्रकल्प अधिकारी, दीपक गुंजे,प्रकल्प अधिकारी क्रांती, शिवाजी शिंदे प्रकल्प अधिकारी, सतीश राठोड प्रकल्प अधिकारी, प्रकल्प अधिकारी हर्षवर्धन अहिरे, कुंभार प्रकल्प अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अग्रजा चिटणीस यांनी करताना सिव्हिल हॉस्पिटल, एस .एस. के. निरामय आरोग्यधाम आणि ए.आर. टी .यांच्याकडून मिळणाऱ्या सोयी सुविधा विषयी मार्गदर्शन केले.
अॅड. किणगी यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यामार्फत मिळणाऱ्या सर्व सुविधा विषयी सर्वांना अवगत केले. नोडल ऑफिसर डॉ. धडके यांनी सिव्हिलमधील ART मधील सर्व सुविधा विषयक माहिती देऊन कुठे अडचणी असल्यास त्याबाबत अवगत सर्वांना सांगितले.
प्रकल्प संचालिका श्रीमती सीमा किणीकर यांनी निरामय आरोग्यधामची वाटचाल याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर न्यायाधीश तथा मानद सचिव विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर देवर्षी यांनी सर्वांचे कौतुक करून वंचित घटकांसाठी विधी सेवा प्राधिकरण नेहमीच कटीबद्ध आणि सोबत असल्याचे सांगितले. याप्रसंगी संपूर्ण सुरक्षा कार्यक्रम याचे आईसी साहित्याचे चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
प्रकल्प अधिकारी सतीश राठोड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलं. याप्रसंगी तृतीयपंथींना TG प्रमाणपत्रांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.उपस्थित महिलांचे स्तन कॅन्सर तपासणी करण्यात आली. डॉ. श्रीमती गायकवाड (ART सेंटर, Solapur) यांनी उपस्थितांचं आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा एड्स नियंत्रण कार्यालय वर्ग, निरामय आरोग्यधाम, संपूर्ण सुरक्षा कार्यक्रम, ए.आर.टी .सेंटर सोलापूर मधील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमास निरामय आरोग्यधाम च्या प्रकल्प संचालिका श्रीमती सीमा किणीकर यांचं मार्गदर्शन लाभले.