Type Here to Get Search Results !

स्वरसम्राट मोहम्मद रफी यांच्या ४४ व्या स्मृतिदिनी मोहम्मद अयाज यांचा 'रफी की याद में' कार्यक्रम


कोल्हापूर : स्वरसम्राट मोहम्मद रफी यांच्या ४४ व्या स्मृतिदिनानिमित्त कोल्हापूर येथील शाहू नगरीत मोहम्मद रफी यांना श्रद्धांजली म्हणून मोहम्मद अयाज यांचा कार्यक्रम होतोय. ३१ जुलै रोजी रात्री ०९ वाजता कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहात 'रफी की याद में' हा कार्यक्रम झंकार बिट्स, कोल्हापूर यांच्या वतीनं या आयोजन करण्यात आलं आहे, तरी जास्तीत जास्त रसिकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन रफी साहेबांची आठवण व गाण्याचे आनंद घ्यावा, असं आवाहन मोहम्मद अयाज यांनी केलंय.

जगभरात मोहम्मद अयाज यांची प्रति रफी अशी ओळख आहे. पद्मविभूषण आशा भोसले, पंडित हृदयनाथ मंगेशकर, पंडित यशवंत देव, उषा मंगेशकर, अनुराधा पौडवाल यासारख्या अनेक दिग्गजांनी अयाज यांना प्रति रफी म्हणून गौरविले तसेच गाण्याच्या एका वाहिनीवर प्रसारित कार्यक्रमात ते महाराष्ट्राचा महागायक म्हणून घोषित करण्यात आले. 

अशा देहवेड्या अवलीया कलावंत मोहम्मद अयाज यांनी मोहम्मद रफी यांना गुरू मानून एकलव्याप्रमाणे संगीत साधना करुन मंद्रुप ते मलेशिया प्रवास गाठला, आपल्या गाण्यात साक्षात रफी साहेबांना उतरवून ते आज जगभर त्यांची गाणी सादर करतात.

यावेळी ३१ जुलै रोजी रात्री ०९ वाजता कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहात 'रफी की याद में' हा कार्यक्रम होणार आहे हा कार्यक्रम झंकार बिट्स कोल्हापूर तर्फे आयोजित करण्यात आला आहे, तरी जास्तीत जास्त रसिक या कार्यक्रमात सहभागी होऊन रफी साहेबांची आठवण व गाण्याचे आनंद घ्यावा, असं आवाहन मोहम्मद अयाज यांनी केलंय.