सोलापूर : 'तू ड्रेनेजची निविदा काढून घे किंवा प्रोटोकॉलप्रमाणे मला दे, अन्यथा तुला अख्या सोलापुरात राहू देत नाही, अशी धमकी देऊन ठेकेदार आकाश उत्तम कानडे (वय-२३ वर्षे, रा-मानेगाव-बार्शी रोड पो. वैराग) याला शिवीगाळ करून हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण झालीय. ही घटना सोलापूर महानगरपालिका, कनिष्ठ अभियंता कार्यालयात मंगळवारी दुपारी १२ वा. च्या सुमारास घडलीय. ठेकेदारास मारहाण करून धमकी दिल्याप्रकरणी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मनीष काळजे याच्यासह दोघांविरुध्द गुन्हा दाखल झालाय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, ०१ जुलै रोजी ११.३० वा. च्या सुमारास ठेकेदार आकाश कानडे याला त्याच्या ओळखीचे इंजिनियर दिपक कुंभार हे मनिष काळजे याच्या ऑफिसमध्ये घेऊन गेले. तेथे काळजी यानी. 'एमआयडीसी अक्कलकोट रोड, सोलापूर येथील ड्रेनेज कामाची भरलेली निवीदा मागे घे किंवा कामाची वर्क ऑर्डर ७६ लाख रूपये असून त्याचे १५ टक्केप्रमाणे ११ लाख रूपये तुला मला द्यावे लागतील ', असे म्हटले.
त्यावेळी आकाश कानडे याने भरलेली निविदा काढून घेण्यास व टक्केवारी देण्यास नकार दिला. तेव्हा काळजे यानी ठेकेदार कानडे यास दमदाटी व शिवीगाळ करून ' तुला काम कसे मिळते ते बघतो, अधिकाऱ्यांना सांगून तुला डिस्क्वालीफाईड करतो ' अशी दमदाटी केली.
आकाश कानडे दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी १२.०० वा. चे सुमारास महानगरपालिका येथील कनिष्ठ अभिंयता रामचंद्र पेंटर यांचेकडे वर्क ऑर्डर निवीदा मंजूर झाली अगर कसे ते पाहण्यासाठी गेले. तेथे मनिष काळजे आले व कामाबाबत चर्चा करू लागले, चर्चेदरम्यान कानडे ऐकत नसल्याचा राग मनात धरून काळजे यानी कानडे याच्या तोंडावर चापटा मारल्या. त्यावेळी दिपक कुंभार यांनी ऑफिसमध्ये काही करून नका, असे बोलून सोडवा-सोडवी केलीय.
याप्रकरणी आकाश कानडे याच्या दाखल केलेल्या फिर्यादीनुसार मनीष काळजे व चालकाविरुद्ध सदर बजार पोलीस ठाण्यात भा. न्याय संहिता कलम ३०८ (३), ११५ (२), ३५२,३५१ (२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल झालाय. पोलीस निरीक्षक लकडे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.