सोलापूर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी, १५ जूलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त "नॉर्थ कोट प्रशाला, पार्क चौक, सोलापूर" येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
यासाठी सोलापूर औद्योगिक परिसरातील नामांकित उद्योजक सहभागी होणार आहेत. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार केंद्राचे सहाय्यक आयुक्त हनुमंत नलावडे यांनी केलंय.
१० वी, १२ वी, पदवीधर, आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअरिंग, जी.एन.एम, एम.बी.बी.एस., बी.फार्म, एम.फार्म, एम.बी.ए. अशा विविध पात्रताधारक उमेदवार या रोजगार मेळाव्यास उपस्थित राहू शकतात. याबाबत काही अडचण आल्यास कार्यालयाच्या ०२१७-२९५०९५६ या दूरध्वनीवर अथवा प्रत्यक्ष भेटीद्वारे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थकोट, पार्क चौक, सोलापूर येथे संपर्क साधावा, असंही आवाहन करण्यात येत आहे.