सोलापूर : लोकसेवक या नात्याने कर्तव्य करीत असताना परिक्षण कालावधीमध्ये भ्रष्ट व गैरमार्गाने कायदेशीर आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक १४,९३,८१७ रुपये किंमतीची अपसंपदा संपादित केल्याप्रकरणी कृषि सहाय्यक काशीनाथ यल्लप्पा भजनावळे यांच्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पत्नी सौ. किशोरी भजनावळे असं दुसऱ्या आरोपीचं नांव आहे.
याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, लोकसेवक काशीनाथ यल्लप्पा भजनावळे यांनी मार्च १९९५ ते माहे जुलै २०१४ या कालावधीत लोकसेवक तथा कृषि सहाय्यक काशीनाथ भजनावळे यांना भ्रष्ट मार्गाने अपसंपदा संपादित केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे, तत्कालीन पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी आणि पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक या चौकशी अधिकाऱ्यांनी चौकशी पूर्ण केली.
त्यात कृषि सहाय्यक काशीनाथ भजनावळे यांनी गेल्या २९ वर्षात ज्ञात उत्पन्नापेक्षा १४,९३,८१७ रुपये अधिक किंमतीची अपसंपदा संपादित केल्याचे निष्पन्न झाले. त्याचं लोकसेवक भजनावळे व त्यांच्या पत्नीचे ज्ञात उत्पन्नाशी एकत्रित टक्केवारी काढता, ती १७.१४ टक्के इतकी अपसंपदा होत असल्याचा निष्कर्ष निघतोय.
या प्रकरणी पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे/खराडे (ला.प्र.वि., पुणे) मार्गदर्शन अधिकारी म्हणून कामगिरी केली. त्यानुसार दाखल फिर्यादीनुसार लोकसेवक काशीनाथ यल्लप्पा भजनावळे (वय-५० वर्षे) आणि त्यांची पत्नी सौ. किशोरी काशीनाथ भजनावळे (वय-४५ वर्षे, दोघे राहणार - मु.पो. सिध्दापूर, ता. मंगळवेढा) यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमासह अन्य अधिनियमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
...आवाहन...
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सोलापूर जिल्ह्यातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधीत काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल अथवा त्याच्या वतीने लाच मागणाऱ्या खाजगी व्यक्तींबद्दल तक्रार असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे टोल फ्री क्रमांक १०६४ अगर दुरध्वनी क्रमांक ०२१७-२३१२६६८ वर संपर्क साधावा.
संपर्क पत्ता- पोलीस उपअधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, श्री छत्रपती शिवाजी रंगभवन चौक सोलापूर.
संकेतस्थळ - www.acbmaharashtra.gov.in
ई मेल - www.acbwebmail@mahapolice.gov.in
ऑनलाईन तक्रार अॅप acbmaharashtra.net
व्हॉटस अॅप क्रमांक 9930997700