कासेगांव/प्रतिनिधी : उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगे येथील हर्षवर्धन हायस्कूलमध्ये बुधवारी, २६ जून रोजी थोर समाजसुधारक तथा आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रारंभी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे सचिव विठ्ठलराव गरड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशालेचे सहशिक्षक संजय जवंजाळ यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनातील प्रसंग व कार्याची महती विद्यार्थ्यांना सांगितले. प्रशालेचे मुख्याध्यापक लक्ष्मण राऊत यांनी छत्रपती शाहू महाराज यांचे विचार आपल्या आचरणात आणावेत, असे आवाहन यावेळी केले.
यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनातील प्रसंग सांगितले. या कार्यक्रमास प्रशालेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पल्लवी दराडे यांनी केले तर ज्ञानेश्वर गुंड यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.