सोलापूर : सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस शिपाई/चालक पोलीस शिपाई भरती-२०२२-२३ साठी आवेदन अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांना कळविण्यात येते की, दि. १९ जून ते २६ जून २०२४ व दि.२८ जून २०२४ रोजी पोलीस शिपाई पदाची व दि.२७ जून २०२४ व दि.२९ जून २०२४ रोजी चालक पोलीस शिपाई पदाची मैदानी चाचणी घेण्यात आलेली आहे.
या घटकात अर्ज केलेल्या ज्या उमेदवारांची एकाच दिवशी इतर घटकात मैदानी चाचणी होती व परिणामी ते उमदेवार या घटकात त्यांना निश्चित करून दिलेल्या दिवशी मैदानी चाचणी करीता हजर राहू शकले नाहीत, अशा सर्व उमेदवारांना या घटकात मैदानी चाचणीकरीता अंतिम संधी म्हणून ०१ जुलै २०२४ रोजी मैदानी चाचणी आयोजीत केली आहे. अशा उमेदवारांनी ते इतर घटकात मैदानी चाचणी करीता उपस्थित होते, याचा पुरावा सोबत आणणे अत्यावश्यक आहे.
उपरोक्त दोन्ही प्रकारच्या उमेदवारांनी सोमवारी, ०१ जुलै २०२४ रोजी सकाळी ०५.०० वाजता पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण येथे हजर रहावं, असं आवाहन सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केलंय.