Type Here to Get Search Results !

किंमत २,८०,००० रुपये ... ! मोटार सायकल चोरांकडून ०७ मोटार सायकली व बॅटऱ्या जप्त


सोलापूर : पोलीस आयुक्तालय अंतर्गत जोडभावी पेठ पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने सराईत मोटार सायकल चोरांकडून ०७ मोटार सायकली व ०२ ट्रकच्या बॅटऱ्या असे एकूण २,८०,००० रुपये किंमतीचे मुद्देमाल हस्तगत करण्यात  आलाय. या पथकाला ०८ गुन्हे उघडकीस आणण्यात उल्लेखनिय यश आलंय.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, जोडभावी पेठ पोलीस ठाण्याकडील गुन्हा रजि.नं. 125/2024 या दाखल गुन्ह्यात अज्ञात चोरट्याने 16 मार्च 2024 रोजी दहिटणे आदर्श नगरातील महादेव अंबादास जतकर यांची होंडा कंपनीची यूनिकॉर्न मोटार सायकल क्र. एम.एच 13 सी.आर 8539 ही मोटार सायकल हॅन्डल लॉक तोडून दिवसाढवळ्या चोरून नेली. 

या गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी सिध्दार्थ उर्फ सिध्दु संतोष हरीदेसी (वय-२३ वर्षे, रा. मु. सेशगिरी पो. मणूर ता. अफजलपुर जि. गुलबर्गा) हा चोरीची मोटरसायकल विक्रीच्या उद्देशाने जुना तुळजापुर नाका, पुणे हायवे येथे येणार असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथकप्रमुख सपोनि / पडसळकर व त्यांचा पथकाने दहिटणे येथून चोरीस गेलेल्या दुचाकीसह पकडले. 

त्यास गुन्हे प्रकटीकरण पथकाने कौशल्याने ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल तपास केले असता, त्याने सोलापूर शहरामध्ये विविध ठिकाणी ०५ व अक्कलकोट शहरामध्ये ०१ मोटार सायकल अशा ०६ मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्याने दिलेल्या माहितीनुसार ०५ मोटार सायकली व त्याच्या ताब्यातील ०१ मोटार सायकल असे ०६ मोटार सायकली जप्त केल्या.

त्यात...

▶️ होंडा कंपनीची युनिकॉर्न एम. एच-13 सी.आर 8539 जुनी वापरती किंमत अंदाजे 40,000 रूपये 

▶️ काळ्या रंगाची सुझुकी अॅक्सेस 125 कंपनीची मोटार सायकल MH-13 CP 8068 जुनी वापरती किंमत अंदाजे 20,000 रुपये 

▶️ काळ्या रंगाची हिरो होंडा कंपनीची स्लेंडर मोटार सायकल एम.एच. -13 ए.बी.5611 जुनी वापरती किंमत अंदाजे 20,000 रुपये 

▶️ होंडा कंपनीची सिल्व्हर रंगाची सीबी शाईन मो. सा.  MH-13 CW-3087 जुनी वापरती किंमत अंदाजे 50,000 रुपये 

▶️ काळ्या रंगाची होंडा कंपनीची शाईन 125 मोटार सायकल MH-13-EH 4522 जुनी वापरती किमत अंदाजे 70,000 रुपये.

▶️ हिरो होंडा कंपनीची काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटार सायकल MH-13-DR 8604 जुनी वापरती अंदाजे किंमत 50,000 रुपये असा एकूण 2,50,000 रुपये येणे किंमतीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या.

तसेच जोडभावी पेठ पो.स्टे. गुरनं. 268/2024 भांदवि कलम 379 प्रमाणे व गुरनं. 356/2024 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील दोन आरोपी निष्पन्न करुन आरोपीतांकडून 01 मोटार सायकल व 02 ट्रकच्या बॅटऱ्या जप्त करुन एकूण 30,000  रुपये किमंतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त (विभाग - 1), अशोक तोरडमल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक  सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जोडभावी पेठ पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहा. पोलीस निरीक्षक सोमनाथ पडसळकर, पोहेकॉ/1370 शितल शिवशरण, पोहेकॉ/1076 श्रीकांत पवार, पोहेकॉ/993 विठ्ठल पैकेकरी, पोकॉ/1321 बसवराज स्वामी, पोकॉ/613 स्वप्निल कसगावडे, पोकॉ/1565 दादा सरवदे, पोकॉ/1657 निलेश घोगरे, पोकॉ/98 अभिजीत पवार, पोकॉ/1504 दत्तात्रय काटे, पोकॉ/1624 मल्लीनाथ स्वामी यांनी पार पाडली.