उत्तर सोलापूर : तालुक्यातील होनसळ येथील डी. एम. प्री प्रायमरी स्कूल व दिलीपराव माने विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात आली.
याप्रसंगी राजर्षी प्रतिमेचे पूजन उपसरपंच प्रगती भडकुंबे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी स्वरांजली कांबळे, अस्पीया पटेल, राजलक्ष्मी चव्हाण या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्पीया पटेल या विद्यार्थिनीने केले.
याप्रसंगी मुख्याध्यापक राजेंद्र मोहोळकर, धर्मदेव शिंदे, उमेश जगताप, अश्फाक अत्तार, अक्तर सय्यद, विनोद राऊत, सुधाकर पवार, तात्यासाहेब तांबे, जरीना सय्यद, सुप्रिया पवार, शशिकांत गायकवाड, विकी माने, शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.