मोहोळ/विष्णू शिंदे : तालुक्यातील सावळेश्वर येथील समस्त धनगर समाज व ओबीसीतील ३७६ जातीच्या आरक्षण लढ्यासाठी एक दिवसाचे साखळी उपोषण करण्यात आले. यामध्ये अंबड तालुक्यातील वडीगोद्री (जिल्हा जालना) येथे उपोषण करणारे प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे व मंगेश ससाणे यांना पाठींबा देण्यासाठी एक दिवसाचे साखळी उपोषण करण्यात आले होते. यामध्ये ग्रामपंचायत सावळेश्वरचे सरपंच सौ. पार्वती गावडे यांनीही ग्रामपंचायतीच्या वतीने ओबीसी आरक्षण बचावसाठी पाठींब्याचे पत्र दिले.
या उपोषणाच्या व आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी गावातील तसेच परिसरातील लांबोटी, पोफळी, रामहिंगणी, मलिकपेठ, या भागातून ओबीसी समाज बांधव तसेच उपोषणास शंभरपेक्षा जास्त ओबीसी बांधवानी उपोषणाला पाठींबा दिला.
हे उपोषण हनुमान मंदिर सभा मंडप, येथे सकल ओबीसी समाज बांधवांतर्फे करण्यात आले. मोहोळ कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनाजी गावडे, माजी पंचायत समिती सदस्य कालिदास गावडे, बाळासाहेब गावडे, शिवाजी काकडे, सिताराम गुंड, नितीन सोनटक्के, नानासाहेब गावडे, दीपक गावडे, शशिकांत गावडे, दादाराव लांडगे, आनंद गावडे, प्रदीप उराडे, नवनाथ आवारे, धनाजी उराडे, सोमनाथ गावडे, भानुदास गावडे, बिरूदेव शेंडगे, प्रभाकर गुंड, सचिन शेंडगे, संतोष गावडे, हनुमंत उराडे, बबन मिसाळ, दत्ता गावडे, राजू टेकाळे, हरिदास गावडे, लक्ष्मण वाघमोडे, नागनाथ गावडे, राजेंद्र लांडगे, जांबुवंत उराडे, समाधान पुजारी, अमित कवितके, बाबासाहेब साबळे यांच्यासह बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते .
यावेळी उपोषणाबाबतचे निवेदन मंडळ अधिकारी प्रकाश दळवी यांनी स्वीकारले, अन् तुमच्या भावना शासनापर्यंत पोहोचवू असे सांगितले.
फोटो ओळ : सावळेश्वर येथील उपोषण स्थळी शिवाजी काकडे, सिताराम गुंड, कालिदास गावडे, नानासाहेब गावडे, बाळासाहेब गावडेसह धनगर समाज बांधव छायाचित्रात दिसत आहेत.