सोलापूर : लोकमंगल कृषी महाविद्यालय, वडाळा येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थी कृषिदूत म्हणून ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम यासाठी मोहोळ तालुक्यातील मोरवंची येथे रवाना झाले आहेत. कृषीदुताचे मोरवंची ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच प्रियंका धोत्रे, ग्रामसेवक सुरेखा वाघमारे व ग्रामस्थांनी स्वागत केले.
हे कृषिदूत त्यांच्या अभ्यासक्रमानुसार १० आठवड्याच्या कालावधीमध्ये मोरवंची गावात वास्तव्यास असतील, या काळात ते शेतकऱ्यांच्या पीक पद्धतीचा अभ्यास करतील, तसेच शेतीविषयक माहिती, नवीन तंत्रज्ञान याविषयी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकांमधून जनजागृती करणार आहेत. यावेळी मोरवंची ग्रामस्थांनी कृषी दूतांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
या अभ्यासक्रमात कृषी दूत म्हणून शंतनू रणदिवे, ओंकार सुरवसे, आकाश विभुते, सौरभ देशमुख, विजय नाईक, विष्णू रेड्डी, साई कुमार आदींनी सहभाग घेतला आहे. याप्रसंगी कृषीदुतांनी विविध उपक्रमाची माहिती दिली. यावेळी सरपंच प्रियंका धोत्रे, ग्रामसेवक सुरेखा वाघमारे, सुरेश धोत्रे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमासाठी कृषी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. अमोल शिंदे, प्रा. नवनाथ गोसावी, कार्यक्रमाधिकारी डॉ. संतोष शेंडे, समन्वयक प्राध्यापक प्रतीक्षा जायभाय यांचे मार्गदर्शन लाभत आहे.