सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त मराठा सेवा संघ आणि सिध्दनाथ ऑप्टिकल्स यांच्या संयुक्त विद्यमाने साळुंखे गल्ली येथे मोफत नेत्र तपासणी शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये सुमारे १०० रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्या समाज बांधवांना मोफत चष्मा वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष शिवश्री प्रशांत पाटील, जिल्हाध्यक्ष शिवश्री डॉ. जी. के. देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष शिवश्री सदाशिव पवार, शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील, जिल्हा समन्वयक दत्ता मुळे, जिल्हा सचिव प्रा. लक्ष्मण महाडिक, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष शिवश्री प्रकाश ननवरे, सचिन चव्हाण, नितीन मोहिते, मराठा सेवा संघाचे शहर उपाध्यक्ष रमेश जाधव, राजू व्यवहारे, प्रकाश डोंगरे, गोवर्धन गुंड, कुमार शिरसागर, आर. पी. पाटील तसेच वधु वर कक्षाचे शहराध्यक्ष राम माने, लिंबराज जाधव, सचिन साळुंखे विघ्नेश काकडे, नारायण साळुंखे,नागनाथ पवार इत्यादी उपस्थित होते.