ठिबक, तुषार सिंचन योजनेचा घ्यावा शेतकऱ्यांनी लाभ

shivrajya patra

 

सोलापूर : कमी पाण्यात शेतकऱ्याला भरघोस उत्पादन घेता यावे व पाण्याचा शेतीसाठी पुरेपूर  वापर शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी  राष्ट्रीय कृषि विकास योजना-प्रति थेंब अधिक पीक या योजनेंअंतर्गत अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी  ठिबक सिंचन, तुषार सिंचन योजनेबाबत अर्ज मागविण्यासाठी 15 ते 30 जून 2024 कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.

या योजनेसाठी अनु. जाती व जमातीच्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.

To Top