Type Here to Get Search Results !

एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेतंर्गत पक्षी व गारपीटरोधक जाळीसाठी अनुदान योजना


सोलापूर : एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेतंर्गत फळपिकांचे पक्ष्यांपासून संरक्षण करण्याकरीता पक्षीरोधक जाळी व फळपिकांचे  गारपिटीपासून संरक्षण करण्याकरीता गारपीट रोधक जाळी  या घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महा-डिबीटी पोर्टल https://mahadbtmahait.gov.in  या संकेतस्थळावर अर्ज करावेत  असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डी.एस. गावसाने यांनी केले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावे स्वत:ची शेत जमीन असणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांकडे फलोत्पान पिके असणे आवश्यक राहिल.जाळी व इतर घटकांचा खर्च  रूपये 35/- प्रती चौ.मी. इतका अपेक्षित धरलेला असून त्यावर शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान देय आहे. सदर अनुदान 5000 चौ.मी. पर्यंत प्रती लाभार्थी देय राहिल.

जिल्ह्यातील सर्वसाधारण, अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती व इतर प्रवर्गातील सर्व शेतकऱ्यांनी  या योजनेचा  लाभ घेण्यासाठी  महा-डिबीटी पोर्टल https://mahadbtmahait.gov.in  या संकेतस्थळावर अर्ज करावेत ,अधिक माहितीसाठी संबंधित नजीकच्या कृषी कार्यालयाशी  संपर्क साधवा,असे अवाहनही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डी.एस. गावसाने यांनी केले आहे.