सोलापूर : राज्यात सर्वत्र शनिवारी शाळेची घंटा वाजली शाळेच्या प्रांगणात त विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला. एम. ए. पानगल अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी "स्कूल चले हम " कार्यक्रम घेण्यात आले. शाळेच्या नईम शेख मेमोरियल हॉलमध्ये सदर कार्यक्रम संपन्न झाले. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांवर पुष्प वर्षाव करून व मिठाई वाटप करून स्वागत करण्यात आले. प्रशालेच्या मुलांना व मुलींना पाठ्यपुस्तक, गणवेश, स्कूल बॅग्जचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे अब्दुल गफुर सौदागर, इब्राहिम जमादार, अब्दुल खालिक सहाब आदि होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. हारुन रशीद बागबान होते. उपमुख्याध्यापिका डॉ. सुरय्या परविन जाहागीरदार, निकहत नल्लामंदू , फौजीया शेख, सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी पालक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अल्ताफ सिद्दिकी यांनी केले तर तारीक शेख यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खलील पेरमपल्ली, मेहमूद खातिब, मोहसीन माशाळ, जैनब कातनघर, रजिया गब्बुरे, सना आवटे आदींनी परिश्रम घेतले.