सोलापूर : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या वतीने घेण्यात आलेल्या हिवाळी सत्र परीक्षा २०२३ चा निकाल जाहीर झाला. या निकालांमध्ये साई आयुर्वेदिक कॉलेज, हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर, वैराग, जि. सोलापूर येथील पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी निकालाची परंपरा कायम राखलीय.० त्यात बी. ए. एम. एस. अंतिम वर्षात शिकत असलेली इसमत जुवेद बागवान ही विद्यार्थीनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालीय.
इसमत ही सिंदफळ येथील प्रगतशील शेतकरी जुवेद बागवान यांची मुलगी आहे. बी. ए. एम. एस. परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल बागवान समाजात तिचं कौतुक होत आहे.
हाजी खुदाबक्ष तुळजापूरे, इक्बाल बागवान, सलीम बागवान, जुबेर बागवान, सुहेल बागवान, सिंदफळ येथील जावीद बागवान, वाहिद बागवान, तेर येथील सिकंदर बागवान यांनी इसमतच्या यशाबद्दल अभिनंदन केलंय.