सोलापूर : राज्यात सर्वत्र शाळेच्या घंटा वाजल्या. शाळेच्या पहिला दिवस असल्याने येथील नॅशनल हायस्कूलमधील विद्यार्थ्यांचं पुष्प आणि शालेय साहित्य देऊन स्वागत करण्यात आलं. या स्वागत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष यु. डी. जागीरदार वकील होते.
प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार इब्राहिम जमादार, पर्ल चॅरिटेबल ट्रस्ट चे चेरमन सुभान ढालायत, सचिव मोहसीन जमादार, समाजसेवक युनूस भाई उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक युसूफ शेख आणि शिक्षकांनी परिश्रम घेतले.