Type Here to Get Search Results !

कामगार मंत्री खाडे यांना महाराष्ट्र कामगार सेनेचा निवेदनाद्वारे सवाल


विडी कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी कधी करणार ? 


सोलापूर : सोलापूर सह महाराष्ट्रातील विडी कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने राज्याचे कामगार मंत्री खाडे यांना कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे मुंबई येथील सुवर्णगड या बंगल्यात देण्यात आले. 

या निवेदनात सोलापुरात गेल्या २२ वर्षापासून विडी कामगारांना कारखानदार किमान वेतन देत नाहीत, म्हणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. त्याचबरोबर महिला बिडी कामगारांना मजुरी वाढीसाठी शासन विडी मालक व कामगार प्रतिनिधी यांचे बैठकीचे आयोजन करावे, अशी मागणी करण्यात आली.

याप्रसंगी कामगार मंत्री खाडे यांनी लवकरच विडी कामगारांच्या प्रश्नासाठी बैठक लावण्यात येईल, असे आश्वासन दिले. कामगार मंत्री खाडे यांना विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिलेल्या शिष्टमंडळात विठ्ठल कुराडकर, प्रा. श्रीशैल वाघमोडे यांचा समावेश होता.

 फोटो ओळ : कामगार मंत्री सुरेश खाडे यांना विडी कामगारांच्या किमान वेतन अंमलबजावणी प्रश्न निवेदन देताना विष्णू कारमपुरी, विठ्ठल कुराडकर, प्रा. श्रीशैल वाघमोडे आदी दिसत आहेत.