Type Here to Get Search Results !

...जेव्हा संसदेच्या पायऱ्या चढत होते, तो क्षण माझ्यासाठी होता खूपच भावनिक : खासदार प्रणिती शिंदे

                       
                              (सर्व छायाचित्रे - शिवभार : एएनआय)

नवी दिल्ली/२४ जून : लोकांची सेवा करण्यासाठी लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेत पहिले पाऊल टाकत होते, तो क्षण माझ्यासाठी खूप भावनिक होता. पण तो ऐतिहासिक असलेल्या जुन्या संसद भवनात असता, तर मला अधिक आनंद झाला असता, असं शब्दात सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी म्हटले. 

जनतेने देशाची सेवा संधी दिली म्हणून लोकशाहीच्या मंदिरात पहिल्यांदा पाऊल टाकले. यापूर्वीची महाराष्ट्रात तीन वेळा आमदार म्हणून जनतेची सेवा केलीय. त्यामुळे जनतेच्या सदिच्छांमुळं लोकशाहीच्या मंदिरात काम करण्याची संधी मिळालीय. 

आजमितीला आमच्यासमोर वाढती महागाई अन् बेरोजगारी, NEET परीक्षा, लोकशाही आणि संविधानाला धोका यासारखी अनेक आव्हाने आहेत, त्यांचा आम्ही सामना करणार आहोत, असंही सोलापूर लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना म्हटलंय.